आषाढ गुरू पोर्णिमेनिमित्त ड्रॅगन पॅलेस विपस्यना मेडिटेशन केंद्रात एक दिवसीय विपस्यना ध्यान शिबिराचे आयोजन

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- गुरू पौर्णिमा तसेच आषाढ पोर्णिमाच्या निमित्ताने कामठी येथे असलेल्या विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस परिसरात असलेल्या ड्रॅगन पॅलेस विपस्यना मेडिटेशन सेंटर येथे रविवार दिनांक 21 जुलै ला सकाळी साडे नऊ ते सायंकाळी साडे चार पर्यंत एक दिवसीय ध्यान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या एक दिवसीय ध्यान शिबिरात किमान एक दहा दिवसीय ध्यान शिबीर झालेल्या साधकांना थेट सहभाग घेता येईल. शिबिराचे संचालन व मार्गदर्शन विपस्वी सहययक आचार्य करणार आहेत.या एक दिवसीय ध्यान शिबिराचा धम्म लाभ घ्यावा असे आवाहन ड्रॅगन पॅलेस च्या प्रमुख व माजी राज्यमंत्री ऍड सुलेखा कुंभारे यांनी केले आहे.

वर्षावास शुभारंभाच्या पाश्वरभूमीवर रविवार 21 जुलै ला सकाळी 8 वाजता ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे पुज्यनिय भिकू संघाद्वारे ऍड सुलेखा कुंभारे यांच्या प्रमुख उपस्थितीत अष्ठशील देण्याचे आयोजन करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला

Sun Jul 21 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या मटण मार्केटच्या मागे असलेल्या एका चाळे समोर एका 45 वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह आढळल्याची घटना आज सायंकाळी सहा दरम्यान निदर्शनास आली असून मृत्यूचे कारण अजूनही कळू शकले नाही। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेऊन पुढील उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह हलविण्यात आले. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com