महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरील कोपरगाव तालुक्यातील गावांच्या समस्यांचा राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी घेतला आढावा

 मुंबईदि. 24- महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा शासनाचा महत्वाचा प्रकल्प असून दर्जाच्या दृष्टीने देशातील सर्वोत्तम प्रकल्प ठरणार आहे. या प्रकल्पामुळे कोपरगाव तालुक्यातील गावांमधील रहिवाशांना जाणवणाऱ्या समस्यांचा सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत आढावा घेतला. या समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधीसंबंधित अधिकारीकंत्राटदार तसेच स्थानिक रहिवाशांसमवेत स्थळ पाहणी करावी आणि समस्यांचे तातडीने निराकरण करावेअसे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे नागपूर ते मुंबई पर्यंतचे बांधकाम निरनिराळ्या 16 टप्प्यांमध्ये सुरू आहे. त्यापैकी अहमदनगर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील टप्प्याअंतर्गत कोपरगाव तालुक्यातील एकूण 10 गावांचा या प्रकल्पात समावेश आहे. या गावांतील रहिवाशांच्या अडचणींचा आढावा घेण्यासाठी आयोजित या बैठकीस आमदार आशुतोष काळेमहाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे मुख्य अभियंता एस.के.सुरवसेअधीक्षक अभियंता व्ही.आर.सातपुते यांच्यासह संबंधित अधिकारीकंत्राटदार आणि संबंधित गावांतील रहिवासी उपस्थित होते.

उपरोक्त कामाच्या कोपरगाव तालुक्यातील टप्प्यात रस्त्यापेक्षा लगतची जमीन खोल असणेविजेची तार जळून वीज बंद होणेसर्विस रोडबैलगाडी रस्ता तयार करणेआरोग्य उपकेंद्राची इमारत बांधणे अशा विविध समस्यांबाबत श्री.बनसोडे यांच्या उपस्थितीत चर्चा करण्यात आली. रहिवाशांना वापरण्याजोगे रस्ते तयार करून देण्याचे निर्देशही त्यांनी दिले

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

वाळूची तस्करी रोखण्यासाठी पोलीस विभागाकडून कडक उपाययोजना - शंभूराज देसाई

Thu Mar 24 , 2022
मुंबई, दि. 24 : वाळूची तस्करी रोखण्यासाठी पोलीस विभागाकडून कडक उपाययोजना करण्यात येतील अशी माहिती गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत दिली.             बुलढाणा जिल्हयातील गोळेगाव येथे वाळू माफीयांतर्फे वाळू वाहतूक विरोध केल्याने एका व्यक्तीस विष पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी विधानसभा सदस्य सुनिल प्रभु,विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, राधाकृष्ण विखे-पाटील,सदस्य बबनराव लोणीकर यांनी प्रश्न उपस्थित केला.या प्रश्नाला उत्तर देताना गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!