वैशाख बुद्ध पौर्णिमा निमित्त ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे ‘महापरित्राणपाठ’ व विशेष बुद्ध वंदना चे आयोजन

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

– पंचशील शांती मार्च च्या माध्यमातून देणार शांतीचा संदेश

कामठी :- वैशाख बुद्ध पौर्णिमाच्या निमित्ताने कामठी येथील विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.त्यामध्ये प्रामुख्याने पुज्यनिय भिक्खू संघाच्या उपस्थितीत वैशाख पोर्णिमेच्या पूर्व संध्येवर बुधवार दिनांक 22 मे रोजी सायंकाळी 7 वाजेपासून ते मध्यरात्री पर्यंत पुज्यनिय भन्तेजी डॉ मेत्तानंद महाथेरो,पुज्यनिय भन्तेजी बोधिरत्न ,पुज्यनिय भन्तेजी नागदीपणकर थेरो, पुज्यनिय भन्तेजी प्रज्ञाज्योति,पुज्यनिय भन्तेजी बोधानंद, पुज्यनिय भन्तेजी कौटिन्य,पुज्यनिय भन्तेजी सोबिदा, पुज्यनिय भन्तेजी ज्योतिबोधी, पुज्यनिय भन्तेजी नंदिता इत्यादी पुज्यनिय भन्तेजींच्या प्रमुख उपस्थितीत महापरित्राण पाठ चे आयोजन करण्यात आले आहे.या महापरित्राण पाठ कार्यक्रमात मोठ्या संख्येने बौद्ध उपासक व उपासिका श्वेत रंगाचे पोशाख परिधान करून उपस्थित राहणार आहेत.

गुरुवार दिनांक 23 मे ला सकाळी 9 वाजता ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे विशेष बुद्ध वंदना व धम्मदेसना घेण्यात येणार आहे.याप्रसंगी उपस्थित भिक्खू संघाला ड्रॅगन पॅलेस टेम्पल च्या प्रमुख व माजी राज्यमंत्री ऍड सुलेखाताई कुंभारे यांच्या शुभ हस्ते चिवरदान व संघदान देण्यात येईल.त्यानंतर सकाळी 10 वाजता विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल ते डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक पर्यंत पंचशिल शांती मार्च काढण्यात येणार आहे.या मार्च चे वैशिष्ट्य असे आहे की शंभर मीटर लांब असलेला पंचशील ध्वज घेऊन शेकडो विद्यार्थी बौद्ध उपासक व उपसिका यात सहभागी होणार आहेत.शंभर मीटर लांब असलेल्या पंचशील ध्वजाच्या माध्यमातून संपूर्ण जगामध्ये शांतीचा संदेश देण्याकरिता हा अभिनव उपक्रम दादासाहेब कुंभारे बहुउद्देशोय प्रशिक्षण केंद्रातर्फे घेण्यात येणार आहे.

गुरुवार दिनांक 23 मे 2024 ला वैशाख बुद्ध पोर्णिमेचे औचित्य साधून ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसरात असलेल्या ड्रॅगन पॅलेस विपस्यना मेडिटेशन सेंटर येथे 23 ते 26 मे 2024 पर्यंत तीन दिवसीय ध्यान शिबिराचे आयोजन सुद्धा करण्यात आले आहे.या शिबिराचा शुभारंभ सायंकाळी 5 वाजता होणार आहे.या ध्यान शिबिरामध्ये ऑनलाईन नोंदणी व्यतिरिक्त साधकांना थेट सहभागी होता येईल अशी माहिती ड्रॅगन पॅलेस विपस्यना मेडिटेशन सेंटर च्या प्रमुख ऍड सुलेखाताई कुंभारे यांनी दिली.

वैशाख पिर्णिमेच्या निमित्ताने ड्रॅगन पॅलेस टेम्पल स्वच्छ धुवून काढण्यात येत आहे .ड्रॅगन पॅलेस टेम्पल च्या मध्यभागी असलेल्या 864 किलो वजनी अखंड चंदनाच्या तथागताच्या मूर्ती समोर सुंदर रंगबिरंगी फुलांनी सजविण्यात येणार आहे.ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथील बगीच्या मध्ये विविध रंगाचे फुलांचे झाडे लावण्यात येत आहेत व ड्रॅगन पॅलेस टेम्पलचा संपूर्ण परिसर पंचशीलच्या झेंड्यानी न्हाऊन गेला आहे.तसेच ड्रॅगन पॅलेस टेम्पल ला आकर्षक विद्दूत रोषणाईने सुद्धा सजविण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

माणुसकीच्या शोधात दिल्लीच्या आनंद ची संपूर्ण भारतात सायकलवारी

Wed May 15 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – सायकल यात्रेतून आरोग्यासह पर्यावरणाचा संदेश कामठी :- मागील तीन वर्षांपूर्वी संपूर्ण भारतात कोरोणाचा प्रादूर्भाव पसरला होता .माणूस माणसाजवळ यायला घाबरत होते..नाते दुरावत होते..माणुसकीचा ऱ्हास होत होता अशा कोरोनाच्या प्रादुर्भावात दिल्लीच्या आनंद सिंह नामक तरुणाचा 2020 मध्ये खाजगी नोकरी गेली व 2021 मध्ये कोरोनामुळे वडील मरण पावले या मानसिक तणावातून बाहेर निघत जगण्यासाठी ऑक्सिजन खूप महत्त्वाचा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com