जी-२० परिषदेनिमित्त छत्रपती चौक स्टेशन येथे महाराजांची मिरवणूक साकारणार

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड

(नागपूर मेट्रो रेल प्रकल्प)

नागपूर : पुढच्या महिन्यात होऊ घातलेल्या G-२० बैठकिकरता नागपुरात जोरात तयारी सुरु आहे. अश्यातच नागपूर मेट्रो तर्फे देखील उज्वल नगर, जय प्रकाश नगर आणि छत्रपती चौक मेट्रो स्टेशन येथे विविध दृश्ये साकारली जात आहेत. या पैकी छत्रपती चौक मेट्रो स्टेशन येथे विविध दृश्ये साकारली जात आहेत. मेट्रो मार्गिकेच्या खाली असलेल्या मीडियन येथे हि कलाकृती साकारली जात आहे.

छत्रपती चौक मेट्रो स्टेशन येथे साकारल्या जाणाऱ्या या शिल्पात महाराज गडावरून पायथ्याशी असलेल्या गावात जात आहेत असे दृश्य साकारले जात आहे. गडाखाली महाराजांचे सैन्य हत्ती, घोड्यांसह वाट बघत असल्याचे दर्शवले आहे. महाराजांचे मावळे आणि गावातील सुवासिनी महाराजांचं औक्षण करण्यासाठी त्यांची वाट पाहत आहेत असा संदर्भ लावून हे महाराज गडावरील पायऱ्या उतरून खाली येत आहेत असं हे शिल्प निर्मित होत आहे.

छत्रपती चौक मेट्रो स्थानकावर साकारल्या जाणाऱ्या या मीरवणुकीत महाराजांचे मावळे हातात विविध वाद्य घेऊन ते वादनास सिद्ध असल्याचे दर्शवण्यात आले आहे. मेट्रो मार्गिका खाली एकूण तीन कलाकृती अश्या प्रकारे साकारली जाणार आहे. एकूणच महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास अश्या प्रकारे नागपूर मेट्रो साकारत आहे.

(सदर देखावा हा मेंटल कलर मध्ये राहील)

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मोहप्यातील युको बँकेची सुलतानी कार्यप्रणाली

Wed Feb 22 , 2023
मोहपा :- मोहपा येथील युको बँकेने शासन निर्णयाला झुगारून जगाच्या पोशिंद्याला वेठीस धरले आहे. पर्यायी इथला शेतकरीवर्ग मरणयातना सोसत असून शेतकऱ्यांना सरकारने दिलेली नुकसान भरपाई मिळत नाही. जसा शेतकऱ्याने शेतकरी होऊन सर्वात मोठा गुन्हा केल्याचं दुःख अनुभवत आहे. मोहपा येथे युको बँक आहे. गावातील नागरिकांचा प्रमुख व्यवसाय शेती असल्यामुळे शेतकऱ्यांचे जास्तीत जास्त खाते युको बँक येथे आहे. केसीसीची वसुली न […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!