नागपूर : अज्ञानतेचा अंधार नाकारुन ज्ञान प्रकाशाला जीवनाचे ध्येय बनविणा-या विद्येच्या क्रांतीज्योती आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या १९2 व्या जयंती निमित्त मनपा केन्द्रीय कार्यालयात अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.
यावेळी उपायुक्त निर्भय जैन, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, सहाय्यक आयुक्त महेश धामेचा, कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण, निगम सचिव डॉ. रंजना लाडे, कार्यकारी अभियंता विजय गुरुबक्षाणी, रक्षमवार आदी उपस्थित होते.
तसेच मनपा तर्फे सुभाष रोड उद्यान तसेच महात्मा फुले मार्केट स्थित सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले.