जी 20 परिषदेनिमित्त आयोजित छायाचित्र स्पर्धेचा निकाल जाहीर

नागपूर :- जी-20 परिषदेनिमित्त छायाचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजेत्यांची घोषणा आज जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर यांनी केली.

विविध पर्यटन स्थळे, विकासकामे, ऐतिहासिक वास्तू, वारसा स्थळे, मंदिरे या संकल्पनेवर आधारित ही छायाचित्र स्पर्धा होती. यामध्ये अ गटात विदर्भातील वाघांचे अस्तित्व व विदर्भातील जंगल या विषयावरील फोटो स्पर्धेत नारायण मालू प्रथम, प्रथिश के. द्वितीय तर आरती फुले यांनी तृतीय क्रमांक मिळविला आहे.

ब गटातील नागपूर हेरिटेज या विषयावरील स्पर्धेत रोहीत लाडसगावकर यांनी प्रथम क्रमांक मिळविला आहे. क गटात नागपुरातील सण, उत्सव, खाणपान व परंपरा या विषयावर निधीका बागडे यांनी प्रथम क्रमांक मिळवला आहे. ड गटात नागपूर जिल्ह्यातील धार्मिक स्थळे या विषयावर अविनाश चौधरी यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला.

एकूण पाच गटात ही स्पर्धा विभागण्यात आली होती. यात अ गटात विदर्भातील वाघांचे अस्तित्व व विदर्भातील जंगल, ब) नागपूर हेरिटेज, क ) नागपुरातील सण, उत्सव, खाणपान व परंपरा, ड) नागपूर जिल्ह्यातील धार्मिक स्थळे आणि इ) नागपूर जिल्ह्यातील पर्यटनस्थळे या गटांमध्ये ही स्पर्धा विभागण्यात आली होती. यापैकी विदर्भातील वाघांचे अस्तित्व आणि विदर्भातील जंगल या विषयावर निवड समितीने प्रथम, द्वितीय आणि तृतीय अशा तीन विजेत्यांची निवड केली आहे. तर उर्वरित तीन गटामध्ये समितीने प्रथम पुरस्कार विजेत्यांची निवड केली आहे. तर नागपूर जिल्हयातील प्रेरणास्थळे या गटात प्रवेशिका प्राप्त झाली नाही.

निवड समितीमध्ये अतिरिक्त जिल्हाधिकारी आशा पठाण, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके, छायाचित्रकार नानु नेवरे, सुदर्शन साखरकर, राकेश वाटेकर यांचा समावेश होता. निवड समितीने छाननीअंती छायाचित्रांची निवड केली. लवकरच मध्यवर्ती संग्रहालयात होणा-या छायाचित्र प्रदर्शनात निवडक छायाचित्रे पाहायला मिळणार आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शीतला अष्टमी पर भजन - कीर्तन सम्पन्न

Thu Mar 16 , 2023
नागपुर :- शहर के बालाजी नगर पश्चिम शीतला माता महिला मंडल की ओर से शीतला अष्टमी पर भजन कीर्तन व महाप्रसाद का आयोजन शीतला माता मंदिर में किया गया। इस अवसर पर परिसर की अनेक माता व बहनों ने बड़ी संख्या में उत्साह के साथ भाग लिया। शीतला माता को भोग अर्पित किया गया। सफलतार्थ शीतला माता मन्दिर की महिला […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights