‘पौर्णिमा दिवसा’ निमित्त रामनगर चौक परिसरात जनजागृती एक तास अनावश्यक वीज दिवे बंद करून नागरिकांचे सहकार्य

नागपूर :- नागपूर महानगरपालिका आणि ग्रीन व्हिजिल फाउंडेशनच्या वतीने माजी आमदार व शहराचे माजी महापौर अनिल सोले यांच्या मार्गदर्शनात मागील अनेक वर्षांपासून पौर्णिमा दिवस अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून शुक्रवारी ७ एप्रिल रोजी रात्री रामनगर परिसरात जनजागृती करण्यात आली.          वीज बचतीसाठी सुरू करण्यात आलेल्या या महत्त्वपूर्ण उपक्रमामध्ये ग्रीन व्हिजिल फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांनी नागरिकांना एक तासासाठी अनावश्यक वीज दिवे बंद करण्याचे आवाहन केले. ग्रीन व्हिजिल चे कौस्तभ चॅटर्जी, सुरभी जैस्वाल, मेहुल कोसुरकर, बिष्णुदेव यादव, प्रिया यादव, श्रीया जोगे, काजल पिल्ले आदी स्वयंसेवकांनी जनजागृती केली.          जनजागृती उपक्रमा दरम्यान ग्रीन व्हिजिल फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी परिसरातील व्यापारी बांधवाना, आस्थापनांना भेट देउन तिथे वीज बचतीचे महत्व सांगितले व नागरिकांना किमान १ तास अनावश्यक विद्युत दिवे बंद करण्याचे आवाहन केले. परिसरातील व्यापारी बांधवांनीही मनपा व ग्रीन व्हिजिल फाउंडेशनच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत विद्युत दिवे बंद करून उपक्रमात आपले योगदान दर्शविले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

स्नेलन चार्टद्वारे जिल्हयातील शालेय मुलांची दृष्टीदोष तपासणी

Sat Apr 8 , 2023
नागपूर :- मुलांच्या दृष्टीदोषाचे लवकर निदान व त्यावरील योग्य उपचार झाल्यास त्यांचा दृष्टीदोष दुर होण्यास मदत होऊन वेळीच आजारावर उपचार करणे सोईचे होईल व त्यामुळे त्यांचे शैक्षणिक विकास होण्यास मदत होणार आहे. याअनुषंगाने जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शालेय मुलांची दृष्टीदोष तपासणी स्नेहल चार्टद्वारे करण्यात येणार आहे. सर्व मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेत स्नेलनचार्टची व्यवस्था करावी,असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com