14 ऑक्टोबर ला कर्मवीर दादासाहेब कुंभारे यांच्या स्मूर्तीदिनानिमित्त ड्रॅगन पॅलेस टेम्पल कॅम्पस परिसरात अभिवादन कार्यक्रमासह विविध जनहितार्थ कार्यक्रमाचे आयोजन  

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

-14 ऑक्टोबर ला सकाळी 9 वाजता विशेष बुद्धवंदना,सकाळी 9.30 वाजता कर्मवीर दादासाहेब कुंभारे यांच्या शिल्पाला माल्यार्पण करून अभिवादन

कामठी :- माजी सांसद सदस्य व बिडी कामगारांचे हृदयसम्राट कर्मवीर ऍड दादासाहेब कुंभारे यांच्या जन्मशताब्दी वर्ष 2023-24 अंतर्गत शनिवार 14 ऑक्टोबर 2023 ला कर्मवीर ऍड दादासाहेब कुंभारे यांच्या स्मूर्तिदिनानिमित्त ड्रॅगन पॅलेस टेम्पल कॅम्पस परिसरात माजी राज्यमंत्री ऍड सुलेखा कुंभारे यांच्या अध्यक्षतेखाली व विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

कर्मवीर ऍड नारायण हरी कुंभारे उपाख्य दादासाहेब कुंभारे यांचा जन्म बिडी उत्पादनाचे प्रमुख केंद्र असलेल्या कामठी शहरात 23 मार्च 1923 रोजी झाला.तर 14 ऑक्टोबर 1982ला ऍड दादासाहेब कुंभारे यांचे दुःखद निधन झाले.

समाजाच्या सर्व आघाडयावर प्रमख भूमिका वठवून आपल्या बहुगुणी नेतृत्वाने समाजाच्या विकासासाठी त्यांनी उभारलेले कष्ट समाज कधीही विसरू शकत नाही.कर्मवीर ऍड दादासाहेब कुंभारे यांच्या जीवनकाळातील भरीव कार्य भारतीयांच्या चिरस्मूर्तीत सदैव कायम राहील.

शनिवार 14 ऑक्टोबर ला कर्मवीर ऍड दादासाहेब कुंभारे यांच्या स्मूर्तिदिनानिमित्त ड्रॅगन पॅलेस कॅम्पस दादासाहेब कुंभारे परिसर कामठी येथे आयोजित विविध कार्यक्रमा अंतर्गत 14 ऑक्टोबर ला सकाळी 9 वाजता विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे माजी राज्यमंत्री ऍड सुलेखा कुंभारे यांच्या मुख्य उपस्थितीत विशेष बुद्ध वंदना होईल त्यानंतर सकाळी साडे नऊ वाजता कर्मवीर दादासाहेब कुंभारे यांच्या शिल्पाला माल्यार्पण करून अभिवादन वाहण्यात येईल.तसेच सकाळी 10 वाजता एमटीडीसी हॉल येथे मोफत नेत्र तपासणी शिबीर, आधार कार्डचे नुतनीकरण तसेच आयुष्यमान कार्ड चे वितरण करण्यात येईल .या शिबिराचे उदघाटन माजी खासदार पद्मश्री डॉ विकास महात्मे यांच्या हस्ते करण्यात येईल. सकाळी 11 वाजता दादासाहेब कुंभारे बहुउद्देशीय प्रशिक्षण केंद्रात युवा सक्षमीकरण व रोजगार मार्गदर्शक शिबिराचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये सूक्ष्म,मध्यम,लघू उद्योग केंद्र नागपूर,रोजगार व कौशल्य विभाग नागपूर, जिल्हा उद्योग केंद्र, खादी ग्रामोद्योग कमिशन नागपूर चा सहभाग राहणार आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री ऍड सुलेखा कुंभारे तर उदघाटक म्हणून महाराष्ट्र राज्य स्किल डेव्हलपमेंट सेंटर नागपूर च्या सहाय्यक आयुक्त सुनंदा बजाज तर प्रमुख उपस्थितीत सूक्ष्म ,लघु,मध्यम मंत्रालय नागपूर चे सहाय्यक निदेशक राहुल कुमार मिश्रा,खादी अँड व्हिलेज इंडस्ट्रीज कमिशन नागपूर च्या जिल्हा समन्वयक निशा सोनेकर, सामाजिक न्याय विभाग नागपूर चे प्रादेशिक उपायुक्त सिद्धार्थ गायकवाड,जिल्हा उद्योग केंद्र नागपूरचे इंडस्ट्री इन्स्पेक्टर मनोहर मेश्राम राहणार आहेत .तेव्हा कर्मवीर ऍड दादासाहेब कुंभारे यांच्या स्मूर्तिदिन समारोह कार्यक्रमाला अधिकाधिक संख्येत नागरिकांनी सहभाग नोंदवूंन आयोजित जनहितार्थ कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक ओगावा सोसायटी, विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल,डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्र,ड्रॅगन पॅलेस विपश्यना मेडिटेशन सेंटर, हरदास शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था,दादासाहेब कुंभारे बहुउद्देशीय प्रशिक्षण संस्था, ड्रॅगन इंटरनॅशनल स्कुल,ओगावा इंटरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेड ने केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्यात येऊ नये

Thu Oct 12 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – कामठी पत्रकार संघाची मागणी कामठी :- राज्य शासनाने राज्यातील कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयामुळे कामठी तालुक्यातील कमी पटसंख्या असलेल्या शाळांना ही हा नियम लागू होणार आहे मात्र असे झाल्यास गोरगरिबांची मुले शिक्षणापासून कायमचे वंचीत राहतील तेव्हा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्यात येऊ नये अशी मागणी कामठी पत्रकार संघाच्या वतीने […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com