संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– शेकडो विपस्वी साधकांनी घेतला सहभाग
– जगातील वर्तमान स्थितीत मनाच्या शांतिकरिता विपश्यना गरजेचे – ऍड सुलेखा कुंभारे
कामठी :- कामठी येथील विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसरात असलेल्या ड्रॅगन पॅलेस विपश्यना मेडिटेशन सेंटर येथे शनिवार 22 जून 2024 रोजी ज्येष्ठ पोर्णिमेच्या निमित्ताने सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत एक दिवसीय भव्य ध्यान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात सहाय्यक आचार्य रूपक डोंगरे यांनी सहभागी झालेल्या साधकांना मार्गदर्शन केले.या शिबिरात प्रामुख्याने ड्रॅगन पॅलेस च्या प्रमुख ऍड सुलेखा कुंभारे ,रेखा भावे, रजनी लिंगायत,नंदा गोदघाटे व शेकडो विपस्वी साधकांनी सहभाग घेतला .
ड्रॅगन पॅलेस विपस्यना मेडिटेशन सेंटर येथे 10 दिवस,3 दिवस व दर पौर्णिमेला एक दिवसीय शिबिराचे आयोजन नियमित केल्या जात असते या शिबिरामध्ये मोठ्या प्रमाणात देशाच्या कानाकोपऱ्यातून साधक सहभागी होऊन ध्यान शिबिराचा लाभ घेत असतात.शिबिरामध्ये सहभागी होण्याकरिता ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.त्यामुळे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र राज्य व्यतिरिक्त इतर राज्यातून सुद्धा साधकांना ड्रॅगन पॅलेस विपस्यना मेडिटेशन सेंटर मध्ये ध्यान करण्याची संधी मिळत असल्याची माहिती ड्रॅगन पॅलेस विपस्यना मेडिटेशन सेंटर च्या प्रमुख व ओगावा सोसायटीच्या अध्यक्षा ऍड सुलेखाताई कुंभारे यांनी दिली.पुढील 10 दिवसीय शिबीर 3 जुलै 2024 ते 14 जुलै 2024 पर्यंत होणार आहे.इच्छुक साधकांना http/forms.gle./HWIPAahSQKXLnRw3A या वेबसाइटवर ऑनलाईन च्या माध्यमातून नोंदणी करता येईल.