नागपूर :- माळी समाज महाराष्ट्रात मोठ्या संख्येत असून टक्केवारी लक्षात घेता लोकसंख्या 12% आहे तर प्रत्येक लोकसभा मतदारसंघात 7 ते 15 टक्के माळी समाजाचे मतदार आहे. परंतु आजपर्यंत भाजपने माळी महासंघाला प्रतिनिधित्व दिले नाही. भाजपने दरवेळेस निवडणुकीत माळी, धनगर, वंजारी, यांच्या नावाचे नारे देऊन मत घेतली. पण माळी समाज लोकसभेत प्रतिनिधित्वपासून वंचित राहिला. महाराष्ट्रात 7 लोकसभा आणि 37 विधानसभेमध्ये माळी मतदारांची संख्या 15 टक्के आहे तर 5 लोकसभा 55 विधानसभेत माळी समाज हा उमेदवाराचा विजय निश्चित करतो. तरीही माळी समाजाला डावलले जाते. अकोला लोकसभा मतदारसंघात 12 टक्के माळी समाज असून ॲड. विशाल प्रभाकर गणगणे हे प्रतिभावान युवा उमेदवार आहे. आणि भाजपा मध्ये अतिशय सक्रिय आहे. त्यामुळे त्यांचा विचार व्हावा. असे आवाहन माळी महासंघाचे महासचिव रवींद्र अंबाडकर यांनी केले आहे.