बॅटऱ्या चोरट्यास अटक करण्यात जुनी कामठी पोलिसांना यशप्राप्त

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या तलीम हॉटेल जवळून एक इसम चोरी केलेली बॅटरी दुचाकीने वाहून नेत असता पेट्रोलिंगवर असलेल्या जुनी कामठी पोलिसांनी सदर आरोपीस ताब्यात घेऊन त्याच्याकडून चोरी करून घेऊन जात असलेली बॅटरी तसेच इतर ठिकाणाहून चोरी केलेल्या दोन बॅटऱ्या हस्तगत करण्यात आल्या.यासंदर्भात फिर्यादी वसीम अहमद वय 34 वर्षे रा भोईपुरा कामठी ने पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून ताब्यात असलेल्या सदर आरोपी विरुद्ध भादवी कलम 379 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक आरोपीचे नाव आबीद बेग अहमद बेग वय 30 वर्षे रा बकरा कमेला कामठी असे आहे.

ही घटना काल सायंकाळी 6 दरम्यान घडली असून सदर आरोपी कडून 25 हजार रुपये किमतीच्या तीन बॅटऱ्या हस्तगत करण्यात आल्या.ही यशस्वी कारवाही डीसीपी श्रवण दत्त, एसीपी संतोष खांडेकर यांच्या मार्गदर्शनार्थ वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक भिताडे,पोलीस उपनिरीक्षक दिलीप थोरवे, मधुकर निखाडे,नरेश गावंडे,फैजूर,श्रीकांत भिष्णुरकर, ताराचंद, अमित,अंकुश, विजय,शंकर ,बंजारा,शारिक,राहुल ठाकूर यांनी केली असून पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

डुमरी पेट्रोल पंपचे लोखंडी पाईप व स्पेन चोरी

Fri Aug 11 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कन्हान :- नागपुर जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्गावर डुमरी जवळ नवनिर्माण पेट्रोल पंप वरील लोखंडी ८० जेक पाईप व ९ स्पेन असा एकुण ४४५०० रूपयाचा मुद्देमाल अज्ञात चोरटयानी चोरी केल्याने कन्हान पोलीसानी अज्ञात आरोपी विरूध्द चोरी चा गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे. रमेशकुमार नरेंद्र चव्हाण वय ३२ वर्ष रा. सालय कोसमी तहसिल बरघाट जिल्हा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com