जुनी कामठी पोलीस स्टेशन दुय्यम पोलीस निरीक्षकविना

संदीप कांबळे, कामठी
कामठी ता प्र 12:-कामठी शहरात कायद्याचे राज्य निर्माण व्हावे या संकल्पनेतून कामठी शहरातील ग्रामीण पोलीस स्टेशन चा कारभार हा शहर पोलीस आयुक्तालाशी जोडत , शहरात दोन स्वतंत्र पोलीस स्टेशन निर्माण करीत या प्रत्येकी पोलीस स्टेशन ला दोन पी आय ची नियुक्ती करण्यात आली होती.शहरातील जुनी कामठी पोलीस स्टेशन परिसरात संवेदनशील स्थिती ही केव्हाही निर्माण होत कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न हा केव्हाही निर्माण होत असल्याची स्थिती आहे तसेच या परिसरात गुन्हेगारीचे प्रमाण अधिक असून अवैध व्यवसायिकांचे मोठ्या प्रमाणात जाळे पसरले आहे.असे असले तरी या जुनी कामठी पोलीस स्टेशन ला पदनिस्थ असलेले दुय्यम(गुन्हे)पोलीस निरीक्षक पदी मागील दीड वर्षांपासून अजूनपावेतो नियुक्ती करण्यात आली नसल्याने जुनी कामठी पोलीस स्टेशन परिसराची संवेदनशीलता कमी झाली असून गुन्हेगारीचे प्रमाण एकदम कमी असून या परिसरात कुठलेही अवैध व्यवसाय सुरू नसल्याचे वरिष्ठांना ज्ञात झाले की काय?असा ही प्रश्न येऊन ठेपला आहे.या परिसरात मागील दोन मूर्ती विटंबना झाल्या असून सदर परिसर शहरातील मध्य कामठी चा भाग येत असून गर्भश्रीमंताची वस्ती सह उच्छभृ राजकीय मंडळी इथेच वास्तव्यास आहे.आगामी निवडणुका व राजकीय परिस्थिती लक्षात घेता कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात ठेवण्याच्या उद्देशाने पोलीस विभागाने आधीपासून नेमून केलेल्या दुय्यम पोलीस निरीक्षक पदी अधिकाऱ्याची नेमणूक होणे गरजेचे आहे.जुनी कामठी पोलीस स्टेशन च्या तुलनेत नवीन कामठी पोलीस स्टेशन ला दुय्यम पोलिस निरीक्षक पद हे कायमस्वरूपी कार्यरत आहे.मात्र जुनी कामठी पोलीस स्टेशन ला दुय्यम पोलीस निरीक्षक चे पद मागील दीड वर्षांपासून अजूनही रिक्त आहे .
नागपूर शहर पोलीस आयुक्तालय परिमंडळ क्र 5 हद्दीत येणाऱ्या जुनी कामठी पोलीस स्टेशन चे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय मालचे यांच्या कार्यकाळात दुय्यम पोलीस निरीक्षक बळीराम परदेसी यांची नोव्हेंबर 2020 मध्ये तहसील पोलीस स्टेशन मध्ये बदली करण्यात आली होती त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय मालचे यांची अंतर्गत बदली होऊन नवीन कामठी पोलीस स्टेशन ला बदली करण्यात आली तर पोलीस निरीक्षक विजय मालचे यांच्या रिक्त ठिकाणी राहुल शिरे यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र आज मे महिना लागून दुय्यम पोलीस निरीक्षक ची बदली होऊन दीड वर्षाचा कालावधी लोटून गेला मात्र या रिक्त पदी अजूनपावेतो दुय्यम पोलीस निरीक्षक ची नियुक्ती करण्यात आली नाही परिणामी कामठी चे जुनी कामठी पोलीस स्टेशन दुय्यम पोलीस निरीक्षक विना आहे हे इथं विशेष!

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा पैसे खात्यावर येईना!

Thu May 12 , 2022
संदीप कांबळे, कामठी कामठी ता प्र 12:-कामठी तालुक्यातील शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या प्रतीक्षेत असताना बहुतेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसेच आलेच नसल्याचे वास्तव आहे. मागच्या वर्षीच्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.शेतकरी आधीच आर्थिक अडचणीत आहे.पावसाळा तोंडावर आला असून शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीत आहे परंतु नापिकीमुळे त्यांच्याजवळ पैसाच नसल्याने पीक विमा योजनेची मंजूर रक्कम मिळेल किंवा पंतप्रधान किसान योजनेचे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com