नागपुर :- इलेक्ट्रिक स्कुटी बाजारात मोठ्या प्रमाणात विकल्या जात आहेत, मी स्वतः ओला कंपनीची स्कुटी खरेदी केली. अवघ्या सहा महिन्यात स्कुटीची नंबर प्लेट तुटली. मी जेव्हा त्यांच्या नागपुरातील मुख्य सेल अँड सर्विस सेंटरला भेट दिली, तेव्हा अनेक स्कुटीच्या नंबर प्लेट तुटलेल्या आढळल्या. म्हणजे या नंबर प्लेट ॲल्युमिनियम (जर्मन) च्या असल्याने त्या लवकर तुटतात.
नंबर प्लेट तुटलेली दिसली की आरटीओ व ट्रॅफिक वाले चालन ठोकतात. कंपनीकडे प्लेटची तक्रार केल्यास प्लेट ही आरटीओ बनवून देतो असे सांगितले जाते. तर आरटीओ वाले ही समस्या कंपनीची असल्याचे सांगतात. चूक कंपनीची किंवा आरटीओ ची कुणाचीही असो प्लेटसाठी 300 तर पेनाल्टी साठी 500 रु चा भुदंड मात्र ग्राहकावर पडतो.
कंपनी लाखोचे टर्नओव्हर करते. त्यामुळे ग्राहकांवर याचा भुदंड पडू नये म्हणून संबंधितांनी याची दखल घेऊन मजबूत किंवा लोखंडी नंबर प्लेट बनवून ग्राहकांच्या स्वाधीन करावी. किंवा तुटलेल्या नंबर प्लेटशी संबंधित भुदंड ग्राहक ऐवजी संबंधितां कडून वसूल करावा.
– मृणाल कुशवाहा