– नवीन महाराष्ट्र सदनात शिबीर संपन्न
नवी दिल्ली :- कस्तुरबा गांधीस्थित महाराष्ट्र सदनात आयोजित दंत आणि नेत्र शिबीराचा लाभ महाराष्ट्र शासनाच्या अधिकाऱ्यांनी तसेच कर्मचाऱ्यांनी घेतला.
नवीन महाराष्ट्र सदनात ‘द केयरींग टच’ च्या सहकार्याने आज दंत आणि नेत्र तपासणीचे एक दिवसीय शिबीर महाराष्ट्र सदनच्या निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांच्या मार्गदर्शनातून आयोजित करण्यात आले.
याअंतर्गत महाराष्ट्र सदन, महाराष्ट्र परिचय केंद्र, बांधकाम विभाग, विद्युत विभाग,महाराष्ट्र सुरक्षा रक्षक तसेच सदनातील अन्य आस्थेपनेवरील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी तसेच त्यांच्या कुटूंबियांनीचीही नेत्र आणि दंत तपासणी मोफत करण्यात आली. यासबंधित काही समस्या असल्यास त्याची संपूर्ण माहिती तज्ञाव्दारे देण्यात आली.
द केयरींग टच च्यावतीने दंत चिकित्सक डॉ. क्षितीजा भक्ते, दंत सहायक सुमीत, नेत्र रोग तज्ञ शोभा या तपासणीसाठी तर शिबीराच्या प्रमुख श्वेता, एचआर प्रमुख कवीता या शिबीराच्या व्यवस्थापनासाठी या उपस्थित होत्या.
या शिबीराचा लाभ सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार, सारीका शेलार, स्मिता शेलार या अधिकाऱ्यांनी तसेच कर्मचाऱ्यांनी दंत आणि नेत्र तपासून करून घेतली.