नागपूर :- प्रतिक्रियात्मकतेपासून सक्रियतेकडे! उन्हाळ्याच्या सुरुवातीला, ऑरेंज सिटी वॉटर (OCW) आपल्या ग्राहकांशी संपर्क साधून त्यांच्या समस्या समजून घेण्याचे आणि NMC-OCW च्या पाणीपुरवठा सेवांबद्दल त्यांच्या समाधानाचे मोजमाप करण्याचे महत्त्वाचे पाऊल उचलत आहे. या उपक्रमाचा उद्देश ग्राहकांना त्रास-मुक्त सेवांसाठी संपर्काचा एकच बिंदू उपलब्ध करून देणे हे आहे.
OCW नोंदवलेल्या तक्रारीना प्रभावीपणे प्रतिसाद देते आणि नागरिकांनी तक्रार करण्यापूर्वीच, पाण्याची समस्या असलेल्या भागातील नागरिकांपर्यंत सक्रियपणे पोहोचते. आमची टीम नागरिकांना वैयक्तिकरित्या भेटत देत आहे आणि आमचे 24×7 कॉल सेंटर आमच्या सेवांबद्दल नागरिकांची अपेक्षा आणि गरजा पूर्ण करण्याच्या खात्री साठी मेल, फोन कॉल आणि झोन कार्यालयात आलेल्या सर्व तक्रारींचे निराकरण करते.
या वर्षी एप्रिल पासून, OCW ने 48,000 पेक्षा अधिक ग्राहकांशी प्रत्यक्ष आणि 5,000 पेक्षा अधिक ग्राहकांना फोनद्वारे संपर्क साधला आहे. या उपक्रमाचा प्रतिसाद अत्यंत सकारात्मक असून, अनेकांनी त्यांच्या समस्या समजून घेण्याच्या आणि त्यांचे निराकरण करण्याच्या आमच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे.
OCW केवळ ग्राहकांचे समाधान मिळवण्यासाठीच नव्हे तर अपेक्षांपेक्षा जास्त आणि नवकल्पनांद्वारे सर्वोतम संभाव्य सेवा सुनिश्चित करण्यासाठी समर्पित आहे. आमचा सक्रिय दृष्टिकोन समुदायाला विश्वसनीय आणि उच्च-गुणवतेच्या पाणीपुरवठा सेवा प्रदान करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा परिपाक आहे.
OCW अशा अनेक प्रयत्नांद्वारे सतत सुधारणा आणि ग्राहक सहभागासाठी वचनबद्ध आहे आणि समाजाला सर्वोत्तम सेवा देण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे.