अमरदिप बडगे,प्रतिनिधी
गोंदिया – ओबीसी संघर्ष कृती समिती व ओबीसी कर्मचारी महासंघ तालुका तिरोडा च्या वतीने आयोजित मंडल यात्रेमध्ये
आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षी ओबीसींच्या हक्क आणि अधिकारासाठी लढाई लढण्यासाठी तयार झालेला बहुजन समाज पाहून खूप आनंद झाला .आपले संविधानिक मूलभूत हक्क आणि अधिकार यासाठी स्वातंत्र्य काळापासून आतापर्यंत होत आलेला ओबीसी वर अन्याय आणि अत्याचार याला वाचा फोडण्यासाठी ओबीसी कर्मचारी संघ या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित होता.
आपल्या मूलभूत हक्काच्या आणि कर्तव्याच्या जाणिवेसाठी आज सर्व बांधव/ओबीसी बांधव एकत्र आले आणि लढाई लढण्यासाठी तयार झाले ही खूप आनंदाची गोष्ट आहे .आपली ही पिढी नोकरी पेशातील शेवटची पिढी असू नये तर पुढेही शासकीय कर्मचाऱ्यांची भरती व्हावी.आपले संविधानिक अधिकार/ मूलभूत अधिकार प्राप्त व्हावे याची जाणीव जागृती आजच्या मंडल यात्रेमधून झाली आणि सर्वांनी आपला सहभाग नोंदविला .
येत्या 7 ऑगस्टला नागपूर या ठिकाणी सर्वांनी परत त्या महा रॅलीमध्ये / महा यात्रेच्या समारोपीय कार्यक्रमात आपण आपल्या हक्क व अधिकारांची जाणिव करुन घेण्यासाठी नव्या उमेदीने सर्व सहभागी व्हावे. अशी विनंती आहे. अशीच बैठक नेहमी होत राहावी. जेणेकरून आपल्या संविधानिक मूलभूत अधिकाराची जाणीव सर्वांना होईल.
आज ज्यांनी सुंदर असे आयोजन आणि नियोजन केलेत असे डी.एच.चौधरी, सुनील पालांदूरकर , पी.आर.पारधी,ए. डी. शरणागत , विलास डोंगरे ,आर. एच. ठाकरे , नरेंद्र आगाशे, वाय. बी. चव्हान,पी. टी. रंगारी , टी. के. बोपचे , प्रविण दमाहे, नोकलाल शरणागत, जे. डी. कडव , दयानंद पटले, जी.आर. बोपचे, परिहार , एम. एन. रहांगडाले ,दयानंद बोपचे, राजू गाढवे , आर. एफ.पटले, गिरीधारी रहांगडाले,दिलीप शेंडे, भावेश तीतीरमारे, अरविंद उके, शिलाताई पारधी अंबुले ,अमोल तीतीरमारे यासह अनेक ओबीसी बांधव बहुसंख्येने हजर होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमृत शरनागत ,दमदार असे संचालन शितलकुमार कनपटे, आभार डी. एच. चौधरी यांनी केले.
सभेला उपस्थित सर्व मान्यवरांनी ओबीसी च्या हक्काची लढाई जिंकेपर्यंत आपण सर्व बांधव वज्रमूठ बांधून ,आपसातील भेद बाजूला सारून एकत्र येऊन लढाई लढूया . हा विश्वास व आशा बागळुन या लढाईत तन-मन-धनाने आपल्या सोबतीला उभे आहोत. अशी आज सर्वांनी ग्वाही दिली.