कुख्यात गुंड स्थानबद्ध 

नागपूर:- नागपूर शहराचे पोलीस आयुक्त यांनी दिनांक १८.०७.२००३ रोजी जारी केलेल्या आदेशान्वये पोलीस ठाणे लकडगंज, कोतवाली, कोराडी, पांचपावली, इमामवाडा आणि सक्करदरा नागपूर चे हद्दीत शरीराविरुद्ध व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारा कुख्यात गुंड नामे रवि उर्फ काल्या वल्द मनोज महतो, वय २२ वर्षे, रा. दूसरा रोड, स्वीपर मोहल्ला, पो.स्टे. कोतवाली, नागपूर शहर यास महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, व्हीडीयो पायरेटस्, वाळु तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणे संबंधी अधिनियम १९८१ अंतर्गत दिनांक १८.०७.२०२३ रोजी स्थानव आदेश पारीत केला. त्यास दि. १८.०७.२०१३ रोजी आदेशाची बजावणी करून नागपूर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे.

रवि उर्फ काल्या वल्द मनोज महतो, याचे विरुध्द पो.स्टे लकडगंज, कोतवाली, कोराडी, पांचपावली. इमामवाडा आणि सक्करदरा नागपूर शहर येथे जबरी चोरी करतांना दुखापत करणे, दरोडा चालणे, फौजदारी कट रचणे, अप्रामाणिकपणे चोरीची मलमत्ता स्विकारणे, अग्निशस्त्र जवळ बाळगणे, अश्लिल शिवीगाळ करणे, दुखापत करणे, जीवे मारण्याची धमकी देणे, प्राणघातक शस्त्रानिशी सज्ज होवुन दंगा करणे, बेकायदेशिर जमावाचा सदस्य असणे, प्राणघातक शस्त्राने दुखापत करणे, शांतता भंग करण्याचे उद्देशाने अपमान करणे, मालमत्तेचे नुकसान करणे, प्राणघातक शवाने गंभीर दुखापत करणे, प्राणघातक शस्त्र जवळ बाळगणे, मनाई आदेशाचे उल्लघन करणे, इत्यादी मालमत्ता आणि शरीराविरूध्द गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत.

सदर प्रस्तावित स्थानबध्द इसमावर चांगल्या वर्तणुकीसाठी पो.स्टे. कोतवाली अंतर्गत २०२२ मध्ये कलम ११०१ई) सीआरपीसी अन्वये प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली होती. सदर प्रस्तावित स्थानबध्द इसमाकडुन चांगल्या वर्तणुकीसाठी दोन वर्ष मुदतीचे अंतिम बंधपत्र घेण्यात आले होते. सदर प्रस्तावित स्थानबध्द इसमाकडुन चांगल्या वर्तणुकीसाठी दोन वर्ष मुदतीचे अंतिम बंधपत्र घेण्यात आले होते. परंतु प्रस्तावित स्थानवन्द इसमाने सदर बंधपत्राचे उल्लंघन करून पोस्टे सक्करदरा व कोतवाली हददीत अश्लिल शिवीगाळ करणे, दुखापत करणे, जीवे मारण्याची धमकी देणे, प्राणघातक शस्त्रानिशी सज्ज हावुन दंगा करणे, बेकायदेशिर जमावाचा सदस्य असणे, प्राणघातक शस्त्राने दुखापत करणे, शांतता भंग करण्याचे उद्देशाने अपमान करणे, मालमत्तेचे नुकसान करणे, प्राणघातक शस्त्राने गंभीर दुखापत करणे, प्राणघातक शस्त्र जवळ बाळगणे, मनाई आदेशाचे उल्लघन करणे, इत्यादी अशा स्वरूपाचे गुन्हे केलेले आहेत. अशाप्रकारे धोकादायक व्यक्ती नामे रवि उर्फ काल्या वल्द मनोज महतो, याची अपराधीक कृत्ये निरंतर वाढत असल्याने आणि त्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण होत असल्याने वरिष्ठ पोलीस निरिक्षक, पोलीस ठाणे कोतवाली, नागपूर शहर यांनी नमुद आरोपीतास स्थानबध्द करण्याकरिता गुन्हे शाखेस प्रस्ताव सादर केला होता. गुन्हेशाखेतील एम. पी.डी.ए. विभागाने नमुद आरोपीला स्थानबध्द करण्याकरीता प्रस्ताव सादर केला. त्याअन्वये स्थान प्राधिकारी मा. पोलीस आयुक्त, नागपूर शहर यांचे समक्ष सादर केले असता त्यांनी वर नमुद स्थानबध्द इसमाविरुद स्थानबध्यतेचा आदेश पारित करून त्यास नाशिक मध्यवर्ती कारागृह, नाशिक येथे ठेवण्याबाबत आदेश दिलेत. त्याअन्वये वर नमुद इसमाविरूध्द स्थानबध्दतेची महत्त्वपूर्ण कारवाई करून त्यास सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नागपूर शहर पोलीस आयुक्तालयातर्फे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे करीता आयोजित १० कि. मी.मॅरेथान स्पर्धा संपन्न

Thu Jul 20 , 2023
नागपूर :- आज दिनांक २०,०७,२०२३ रोजी सकाळी ०८:०० वा पोलीस भवन, सिव्हील लाईन, नागपुर येथे पोलीस आयुक्त नागपुर शहर अमितेश कुमार यांनी पोलीस अधिकारी व अमलदार यांचे शारिरीक स्वास्थ सुदृढ रहावे यानिमीत्ताने आयोजीत १० कि.मी. नागपुर पोलीस मॅरेथॉनला सह पोलीस आयुक्त अक्ष्वती दोर्जे यांचे व वरीष्ठ पोलीस अधिकारी यांचे उपस्थितीत हिरवी झेंडी दाखवून सुरवात केली. अति उत्साहात पोलीस अधिकारी व […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com