ना. सुधीर मुनगंटीवार यांनी पहिल्या मतदाराचा घेतला आशिर्वाद

– प्रचाराला सुरुवात करण्यापूर्वी पहिल्या मतदाराचा घेतात आशिर्वाद; शेवटच्या दिवशी शेवटच्या मतदाराचा आशीर्वाद

चंद्रपूर :- सुधीर मुनगंटीवार गेल्या 30 वर्षांपासून जनतेची सातत्याने सेवा करीत आहेत. आता सातव्यांदा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत आणि त्यांचा विजय पक्का आहे. पण सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रत्येक कार्यात वेगळेपण आणि नाविन्य असतं. त्यातील एक म्हणजे निवडणुकीच्या मुख्य प्रचाराची सुरुवात करताना पहिल्या मतदाराचा आशिर्वाद घेणे होय. संपूर्ण राज्यामध्ये मतदारांशी संबंध प्रस्थापित करण्याचा असा अनोखा आणि आगळावेगळा प्रयोग करणारे सुधीर मुनगंटीवार पहिलेच नेते आहेत.

सर्वसामान्य जनतेशी प्रत्यक्ष संबंध असणारे सुधीर मुनगंटीवार एकमेव नेते आहेत. मतदारसंघातील कोणत्याही व्यक्तीने फोन केल्यावर त्या माणसाला सुधीरभाऊंचा फोन येणार नाही असे कधीच घडले नाही. युवकांकडून ते वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत कोणीही फोन केला, पत्र लिहिलं, निवेदन दिलं तर त्या प्रत्येक व्यक्तीला उत्तर आल्याशिवाय राहत नाही.

मागील सहा निवडणुकीत त्यांनी प्रचाराची सुरुवात करण्याआधी पहिल्या मतदाराचा आशीर्वाद घेतला आहे. तर प्रचाराचा शेवट सुद्धा शेवटच्या मतदाराचा आशीर्वाद घेऊन करतात. आता सातव्यांदा अर्ज दाखल केल्यावर पहिल्या बूथच्या पहिल्या अनुक्रमणिकेतील, पहिल्या यादीतील पहिल्या मतदाराचा आशीर्वाद त्यांनी घेतला. भटाळी पायली येथे आशा विकास आलोने या पहिल्या मतदाराचा आशीर्वाद त्यांनी घेऊन सत्कार केला. मतदार यादीतील पहिल्या आणि शेवटच्या क्रमांकावरील मतदारांचा असा सन्मान करणारे ते एकमेव नेते आहेत, हे विशेष.

संपूर्ण जिल्ह्यात इतका दांडगा जनसंपर्क कोणत्याही नेत्याचा नाही. विरोधकांशी लढताना आपलं अस्त्र केवळ जनतेचे प्रेम आहे, असे सुधीरभाऊ नेहमी सांगतात. आज त्यांनी पहिल्या मतदारासोबतच शालिनी धर्मेंद्र आलोने , सुंगदा मेश्राम, शारदा भसारकर, योगेश अलोने या मतदारांचे आशीर्वाद घेऊन सत्कार केला. सातव्यांदा निवडणूक लढवत असलेल्या सुधीर मुनगंटीवार भटाळी पायली येथील लोकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद सुधीर मुनगंटीवार यांना मिळाला.

यावेळी भटाळी गावाच्या पुनर्वसनाचे आश्वासन सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. भविष्यात मोठे उद्योग आणून स्थानिकांना नोकरीत प्राधान्य देणार असून भविष्यात फिरते जनसंपर्क कार्यालय निर्माण करून नागरिकांच्या समस्या आणखी लवकर सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असा शब्द त्यांनी दिला. तसेच ‘आवाज दो’ या अभियानाच्या माध्यमातून दहा टेलिफोन नंबरवरून नागरिकांना आपल्या समस्या माझ्यापर्यंत पोहचवता येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

किशोर कन्हेरे काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी

Mon Nov 4 , 2024
– माळी समाजाला काँग्रेस कडून सन्मान नागपूर :- काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे आणि महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आणि काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पाटोले, माजी मंत्री आमदार सुनील केदार, माजीमंत्री नितीन राऊत, मुंबई अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड, खा.श्याम कुमार बर्वे, खा.सतेज पाटील, आदींच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस मध्ये नुकतेच प्रवेश केलेले माळी समाजाचे नेते किशोर कन्हेरे यांची आज […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com