संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– एक स्कॉर्पिओ, एक ट्रक कंटेनर,नऊ मोबाईल जप्त ,एकूण 43 लक्ष 65 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त
– सहा आरोपी अटकेत
कामठी :- मागील काही दिवसापूर्वी तहसील पोलीस स्टेशन हद्दीत गोवंश तस्कर बाजाकडून एका पोलीस कर्मचाऱ्याला कोंबून नेण्याची घटना घडली होती या घटनेला सी पी अमितेशकुमार यांनी गांभीर्याने घेत अवैध गोवंश व्यवसायिकांचे मुसक्या बांधण्यासाठी कम्बर कसली. या पाश्वरभूमीवर सर्व पोलीस स्टेशन अलर्ट करण्यात आले असून त्यानुसार याच अलर्ट भूमिकेतून सी पी अमितेशकुमार यांच्या खांद्याला खांदा लावत नवीन कामठी पोलीस स्टेशन च्या पोलीस कर्मचाऱ्यांनी योग्यरीत्या सापळा रचून लिहिगाव मार्गे होत असलेल्या अवैध गोवंश तस्करबाजावर धाड घालण्यात यश गाठले असून या धाडीतून 30 गोवंश जनावरे जप्त करण्यात आली मात्र त्यातील दोन गोवंश जनावरे मृतावस्थेत आढळल्याने 28 गोवंश जनावरांना भंडाराच्या गोरक्षण शाळेत सुरक्षित हलवून कत्तलखान्यात कत्तलीसाठी जात असलेल्या गोवंश जनावरांना जीवनदान दिल्याची यशस्वी कारवाही आज सकाळी 7 दरम्यान केली असून या धाडीतून 30 गोवंश जनावरे ,एक कंटेनर ट्रक, एक स्कॉर्पिओ वाहन,नऊ मोबाईल असा एकूण 43 लक्ष 65 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत सहा आरोपीवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आले तसेच दोन पाहिजे आरोपीवीर सुदधा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अटक सहा आरोपीमध्ये शौकीन अली शरीफ अली वय 25 वर्षे रा उत्तरप्रदेश,मो आशु उर्फ बेहरा शहीद खान वय 32 वर्षे रा उत्तरप्रदेश, राजकिशोर भुरे निषाद वय 39 वर्षे रा उत्तरप्रदेश, अर्षद उद्दीन फहीम उद्दीन वय 25 वर्षे रा मध्यप्रदेश,मो रिजवाण मुनिर खान वय 34 वर्षे रा मध्यप्रदेश, इनायत अली मोबीन अली वय 24 वर्षे रा माध्यप्रदेश तर पाहिजे दोन आरोपी मध्ये फाजील नावाचा इसम रा उत्तरप्रदेश ,दहा चाकी कंटेनर चा मालक चा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या लिहिगाव मार्गे गोवंश जनावरांची अवैध वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी योग्यरीत्या सापळा रचून लिहिगाव मार्गे 10 चाकी कंटेनर क्र यु पी 70 जी टी 2423 व एक स्कॉर्पिओ ने गोवंश जनावराना निर्दयतेने,क्रूरतेने वागणूक देऊन एकावर एक कोंबून अवैधरित्या कत्तलखान्यात कत्तलीसाठी नेत असताना पोलिसांनी वेळीच दोन्ही वाहनावर धाड घालून सहा आरोपीना अटक करीत 43 लक्ष 65 हजार 500 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही यशस्वी कारवाई डीसीपी श्रवण दत्त व एसीपी नलावडे यांच्या मार्गदर्शनार्थ वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोरे, पोलीस उपनिरीक्षक श्याम वारंगे, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण रंदई, पोलीस उपनिरीक्षक किशोर मोतींगे, सुरेंद्र शेंडे यासह नवीन कामठी पोलिसांनी केली असून पुढील तपास सुरू आहे.