धर्मराज प्राथमिक शाळेच्या “भारत माता की जय” च्या घोषणेने दुमदुमली कांद्री नगरी..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

हरघर तिरंगा  करिता जनजागृती पर रॅली. 

कन्हान : – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त धर्मराज प्राथमिक शाळेच्या वतीने ” सन्मान तिरंगा ” जनजागृती रॅली आज ( दि.८) कांद्री नगराचे भ्रमण करित “भारत माता की जय” च्या विद्यार्थ्यांच्या जय घोषणेने कांद्री नगरी दुनदुमली.

धर्मराज प्राथमिक शाळेच्या वर्ग तिसरी व चवथी च्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा घेत भारत माता की जय चा जयघोष करीत जनजागृती रॅली काढली. या रॅलीला शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व ग्राम पंचायत सदस्य चंद्रशेखर बावनकुळे, मुख्या ध्यापक  खिमेश बढिये यांनी हिरवा झेंडा दाखवि ला. अत्यंत शिस्तबद्ध रितीने चिमुकल्यांनी ‘भारत माता की जय,” “हर घर तिरंगा,” “तिरंगे की रक्षा कोन करेंगा हम करेंगे , हम करेंगे” या घोषणा देत कांद्री गावात प्रभातफेरी काढली. गांधी चौकात जनजागृती रॅलीचे ग्राम पंचायत कांद्री तर्फे सरपंच बलवंत पडोळे यांच्या नेतृत्वाखाली स्वागत करण्यात आले. यावेळी सरपंच बलवंत पडोळे, मुख्याध्यापक  खिमेश बढिये यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्प हार अर्पण केला. शाळेच्या वतीने भिमराव शिंदेमे श्राम यांनी प्रास्ताविक करून रॅलीच्या आयोजनाची भुमिका विशद केली. सरपंच  बलवंत पडोळे यांनी चिमुकल्यांचे कौतुक करीत सर्वांनी ” हर घर तिरंगा ” हा राष्ट्रीय उपक्रम यशस्वी करण्याचे आवाहन केले. मुख्याध्यापक  खिमेश बढिये यांनी धर्मराज प्राथमि क शाळेच्या वतीने या उपक्रमांतर्गत व्यापक जनजागृ ती करण्यात येत असल्याचे सांगुन प्रत्येक पालकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. उपस्थितांचे आभार राजु भस्मे यांनी मानले. कांद्री ग्राम पंचायत च्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना बिस्कीटचे वाटप करण्यात आले. यावेळी उपसरपंच  बबलु बर्वे, ग्राम पंचायत सदस्य शिवाजी चकोले, चंद्रशेखर बावनकु ळे,  राहुल टेकाम, प्रकाश चाफले , धनराज कारेमोरे, आशा कनोजे, मोनाली वरले, महेश झोडावणे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य विधिलाल डहारे,स्वाती गि-हे, गणेश सरोदे यांच्यासह मोठय़ा संख्येने पालक वर्ग उपस्थित होते. जनजागृती रॅलीच्या यशस्वी आयोजनास भिमराव शिंदेमेश्राम,  राजु भस्मे,  चित्रलेखा धानफोले, हर्षकला चौधरी,  शारदा समरीत,  अर्पणा बावनकुळे,  सुनीता मनगटे सह विद्यार्थ्यानी सहकार्य केले.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!