‘त्या’ आरोपी वाहनचालकाचा शोध लावून अटक करण्यात नवीन कामठी पोलिसांना यशप्राप्त

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

-एक्सिस बँक कर्मचाऱ्याच्या अपघाती मृत्यू प्रकरणातील आरोपीस अटक 

कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामठी-कळमना मार्गावरील रणाळा परिसरातील एटीएम केंद्रासमोर 26 जानेवारीच्या रात्री 12 नंतर घडलेल्या अज्ञात इनोव्हा कार व दुचाकी अपघातात दुचाकीस्वार एक्सिस बँक कर्मचाऱ्याचा काल मध्यरात्री 3 दरम्यान नागपूर च्या न्यूरॉन हॉस्पिटलमध्ये उपचारदारम्यान जख्मि दुर्गेश पाल वय 28 वर्षे रा न्यू येरखेडा कामठी नामक तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली असता या घटनेने सर्वत्र शोककळा पसरली होती.दरम्यान मृतकाच्या पार्थिवावर शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार करण्यासाठी मृतकाचे पार्थिव कामठी येथील मोक्षधाम आणले असता संतप्त नातेवाईक तसेच स्नेहसंबधितांनी या अपघाती घटनेसंदर्भात आरोपीचा शोध लागला नसून आरोपी अजूनही अटकेबाहेर असल्याच्या संतापातून मृतदेहाचे पार्थिव कामठी पोलीस स्टेशन समोर ठेवून आरोपीच्या अटकेची मागणी करण्याचे ठरविण्यात आले. यासंदर्भात उपस्थित पोलिसांनी संतप्त नागरिकांना समज देण्याचा प्रयत्न केला पण परिस्थिती समजण्या पलीकडे होतो. अखेर समजुतदारीतुन पोलीस निरीक्षक भरत क्षीरसागर आणि पोलीस उपनिरीक्षक किशोर मोतींगे यांनी आश्वासीत केल्याप्रमाणे नागरीकानी पोलिसांवर विश्वास ठेवत कसेबसे अंत्यसंस्कार पार पाडले तर पोलिसांनी सुद्धा आरोपीच्या शोध लावण्याच्या विश्वासाला तडा जाऊ न देता अखेर त्या आरोपीचा शोध लावण्यात यश गाठले.तर अटक आरोपी इनोव्हा कार चालकाचे नाव भारत घुग्गुस्कर वय 23 वर्षे रा. बिडगाव कामठी असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतक दुर्गेश पाल हा कामठीच्या एक्सिस बँक मध्ये नोकरीवर कार्यरत होता. 26 जानेवारीच्या रात्री 12 नंतर काही कामानिमित्त होंडा शाईन दुचाकी क्र एम एच 40 ए जी 7869 ने कळमनाच्या दिशेने सदर घटनास्थळ मार्गे जात असता नागपूरहुन कामठीकडे भरधाव वेगाने येत असलेल्या इनोव्हा कार क्र एमएच 06 ए एन 0007 च्या आरोपी चालकाने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत घडलेल्या अपघातातून दुचाकीस्वार गंभीर जख्मि झाला होता तर आरोपी कार चालकाने भीतीपोटी घटनास्थळाहुन पळ काढण्यात यश गाठले होते. सदर जख्मिला तडकाफडकी सिटी हॉस्पिटल मध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.मात्र परिस्थिती नाजूक असल्याने जखमींला नागपूर च्या न्यूरॉन हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले.दरम्यान जख्मि तरुणाने मृत्यूशी झुंज देत काल मध्यरात्री अखेरचा निरोप घेतला. पोलिसांनी यासंदर्भात वाहनचालकविरोधात कायदेशीर गुन्हा दाखल करून तपासात सीसीटीव्ही फुटेज ची पाहणी केली असता घटना वेळी एक पांढऱ्या रंगाची इनोव्हा कार दिसत असून त्या कार च्या मागच्या बाजूला महाकाल असे लिहिले आहे तर गाडी नंबर पुसकट असून स्पष्ट दिसून येत नाही. पोलिसांनी तपासाला गती देत आरोपीचा कसून शोध घेतला असता आरोपीस बिडगाव हुन अटक करण्यात आले .पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर मोतींगे करीत आहेत. तर मृतकाला पत्नी,एक तीन वर्षाची चिमुकली मुलगी, आई, वडील,एक लहान भाऊ असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सुवर से टकराकर बाईक चालक जख्मी..

Fri Feb 3 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 3 :- स्थानिक नई कामठी पोलीस स्टेशन अंतर्गत आने वाले हॉकी बिल्डिंग कलमना रोड कश्यप हॉउस के सामने बाईक के सामने सुवर आने से सूअर को टकराकर बाईक चालक भूषण नगर येरखेड़ा निवासी दिनेश बलिराम रायबोले उम्र 42 जख्मी हो गये स्थानीय लोगो ने उन्हें उपचार हेतु सिटी हॉस्पिटल मे भरती किया!उपचार जारी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com