संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 29:- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन मध्ये भादवी कलम 399 यासह अन्य गंभीर गुन्हे अंतर्गत दाखल गुन्ह्यातील तीन आरोपीना आज कामठी न्यायालयात पेशी तारखेवर हजर केले असता या तीन आरोपीमधून एक सराईत गुन्हेगार संधी साधून कामठी न्यायालयातून पसार झाल्याची घटना आज दुपारी 1 वाजुन 15 मिनिटांनी घडली होती दरम्यान नवीन कामठी पोलिसांची एकच तारांबळ उडाली होती.या आरोपीच्या शोधकार्याला पोलिसांनि दिलेल्या गतीतून सदर पसार आरोपीस कळमना रोड, पासिपुऱ्याच्या बागडोर नाल्याजवळून अटक करण्यात पोलिसांना यशप्राप्त झाले असून अटक आरोपीचे नाव शेख जाफर शेख मुजाफर वय 35 वर्षे रा.कामगार नगर कामठी असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भादवी कलम 399 अंनव्ये दाखल गुन्ह्यातील तीन आरोपी नामे शेख जाफर शेख मुजाफर, शेख शबिब, मो आबीद उर्फ चाटी सर्व राहणार कामठी हे नागपूर च्या मध्यवर्ती कारागृहात पोलीस न्यायालयीन कोठडीत होते.यातील तीनही आरोपींची आज 30 जुलै ला कामठी च्या दिवाणी व फौजदारी न्यायालयात पेशी तारीख असल्यामुळे नागपूर मध्यवर्ती कारागृहातील पोलीस कर्मचारी हे या तिन्ही आरोपीना कामठी च्या न्यायालयात दुपारी 1 वाजता आणून न्यायाधीश कोटणीस यांच्या न्यायालयात हजर करायला नेत असता दारातच न्यायाधीश उपस्थित नसल्याचे कळताच उपस्थित संबंधित पोलीस कर्मचारी वार्तालाप करण्यात व्यस्त असल्याचे संधी साधून या तीन आरोपी मधील सराईत गुन्हेगार असलेला मो जाफर नामक आरोपीने स्वतःला हतकडी व दोरमुक्त असल्याचे संधी साधून कोर्टातून पळ काढला असता उपस्थित पोलिसांनी त्याचा पाठलाग करून पकडण्याचा प्रयत्न केला मात्र सदर सराईत गुन्हेगाराने न्यायालय इमारतीच्या पाठीमागील झाडीझुडपीतून पळ काढण्यात यश गाठले.घटनेची माहिती हवेसारखी पसरताच सर्वत्र चर्चेचा विषय ठरला.तर नवीन कामठी पोलीस स्टेशन मध्ये एकच खळबळ माजली असून नवीन कामठी पोलीस पथक आरोपीच्या शोधार्थ युद्धपातळीवर कर्तव्य बजावत होते .दरम्यान नवीन कामठी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष वैरागडे , डी बी स्कॉडचे इंचार्ज पोलीस उपनिरीक्षक श्याम वारंगे व सहकारी डी बी पथकाने यशस्वी भूमिका साकारून आरोपीस अटक करण्यात यश गाठले.