संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 30 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन मध्ये भादवी कलम 399 अंतर्गत दाखल गुन्ह्यातील आरोपी शेख जाफर नामक आरोपीने कामठी न्यायालयातून पळ काढल्याच्या घटनेने आरिपीचा शोध घेवुन आरोपीस अटक करणे हे एक आव्हानच होते या आव्हानाला स्वीकारून नवीन कामठी तसेच जुनी कामठी पोलीस स्टेशन चे पोलीस पथक हे सर्वत्र गस्त घालून आरोपीच्या शोधात असता जुनी कामठी पोलीस स्टेशन च्या पोलीसांना मनीष श्रीवास हत्याकांडातील अटक आरोपी गँगस्टर रंजित सफेलकर चा सहपाठी असलेला व खुनाच्या गुन्ह्यासह मोक्का च्या गुन्ह्यात पसार असलेला आरोपी घोरपड लिहिगाव मार्गावर दिसला त्याचा पाठलाग केला असता त्याने एका शेतातुन पळ काढला , अखेर पोलिसांनी त्याचा एक ते दीड किलोमीटर सतत पायी धावत पाठलाग करून फिल्मी स्टाईल ने अटक करण्यात यश गाठल्याची कारवाही आज दुपारी साडे तीन दरम्यान केली असून अटक आरोपीचे नाव अब्दुल ताज अब्दुल अजीज वय 30 वर्षे रा चित्तरंजन दास नगर, बाबा अब्दुल्लाह शाह दरगाह जवळ कामठी असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 4 मार्च 2012 ला नागपूर चे रहिवासी मनीष श्रीवासला एका मुलीच्या सहाय्याने कामठी तालुक्यातील पावनगाव रोड वरील एका घरात बोलावून आरोपीने मनीष श्रीवास चा तलवारीने गळा कापून त्याच्या शरीराचे तुकडे करून मृतदेह एका बोऱ्यात भरून कुरई घाटात फेकून दिले होते यासंदर्भात मनीष श्रीवासची पत्नी सावित्री श्रीवास ने पाचपावली पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध भादवी कलम 365, 302,201,212,120(ब),143,144,147,148,149,364 ,भादवी सहकलम भारतीय हत्यारबंदी कायदा सह कलम मोक्का दाखल करण्यात आला होता .यातील आरोपी रंजित सफेलकर, कालु हाटे, भरत हाटे,, छोटू बागडे,इसाक मस्के,सिनू अण्णा,विनय बाथो सर्व राहणार कामठी ला अटक करण्यात आले आहे तर या गुन्ह्यातील पसार आरोपीमध्ये असलेले बाबा अब्दुल्ला शाह दरगाह येथील पसार आरोपी मोहतासिंग ला मोरफाटा येथून अटक करण्यात आले होते तर आज 30 जुलै ला जुनी कामठी पोलिसांनी पसार आरोपीतील अब्दुल ताज अब्दुल अजीज वय 27 वर्षे रा बाबा अब्दुल्लाह शाह दरगाह ला अटक करण्यात यश गाठले.
ही यशस्स्वी कारवाही डीसीपी सारंग आव्हाड,एसीपी नयन आलूरकर यांच्या मार्गदर्शनार्थ वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहूल शिरे, डी बी स्कॉड चे इंचार्ज पोलीस उपनिरीक्षक केरबा माकने, डी बी स्कॉड चे संजय गीते,अंकुश गजभिये, महेश कठाने, प्रमोद शेळके यांनी केला असून पुढील तपास सुरू आहे.