नवीन कामठी व जुनी कामठी पोलीस स्टेशन येथे परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

संदीप कांबळे, कामठी
कामठी ता प्र 14:-भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार , परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त आज 14 एप्रिल ला नवीन कामठी पोलीस स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष वैरागडे यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून मानवंदना वाहण्यात आली.याप्रसंगी दुय्यम पोलीस निरीक्षक कमलाकर गड्डीमी,सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बहतुकले, पोलीस उपनिरीक्षक श्याम वारंगे, पोलीस उपनिरीक्षक नितीन पवार,प्रवीण रंदी, पोलीस उपनिरीक्षक किशोर मोतींगे, महिला पोलीस उपनिरीक्षक गीता रासकर, पप्पू यादव, लांजेवार, सुरेंद्र शेंडे, संदीप सगणे, आदी उपस्थित होते.

जुनी कामठी पोलीस स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल शिरे यांच्या मुख्य उपस्थितीत डॉ बाबासाहेब आंबेडकरांना सामूहिक मानवंदना वाहण्यात आली.याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक आकाश माकने, पोलीस हवा बागडी, संजय गीते, तंगराजन पिल्ले, वर्मा,किशोर मालोकर आदी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असा भारत निर्माण होणे गरजेचे- माजी जि प अध्यक्ष सुरेश भोयर

Thu Apr 14 , 2022
संदीप कांबळे, कामठी कामठी ता प्र 14 – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भारत देशाला अर्पण केलेल्या भारतीय संविधानानुसार भारत देशाचा राज्यकारभार सुरू आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असा भारत निर्माण होईल तेव्हाच बाबासाहेबांची खरी जयंती साजरी केल्याचे समाधान प्राप्त होईल असे मत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेशभाऊ भोयर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीदिन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com