ज़ो पर्यन्त जनतेचे प्रश्न सूटत नाही तो पर्यन्त आन्दोलन – दुनेश्वर पेठें
नागपूर :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नागपूर शहर तर्फे शुक्रवार दिनांक २ जून २३ रोजी महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी M.S.E.B मुख्य अभियंता यांना शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर शहरात विद्युत वितरण संबंधित अनेक समस्या सोडवण्या बाबत आंदोलन करून निवेदन देण्यात आले.
निवेदनाचे विषय खालील प्रमाने.
1) वारंवार विद्युत प्रवाह खंडित होणे.
2) विद्युत प्रवाह खंडित झाल्यावर संबंधित पावर हाउस व टेलिफोन कोणी उचलत नाही जर उचलला तर कर्मचारी आणि दुरुस्ती वाहन उपलब्ध नाही तक्रार दिल्याच्या नंतर तीन-चार तास कर्मचारी दुरुस्ती साठी येत नाही.
3) बऱ्याच एरियामध्ये विदयुत पुरवठ्याची मागणी वाढली असल्यामुळे वोल्टेज अपुरा असतो.
(4) विदयुत पुरवठ्यापेक्षा विद्युत मागणी जास्त असल्यामुळे आणि पुरेशा वोल्टेज असल्यामुळे टीव्ही, फ्रिज, एसी, कुलर, काम करत नाही आणि हाय आणि लो होल्टेज असल्यामुळे घरगुती इलेक्ट्रिक वस्तू मध्ये बिघाड येत आहे.
(5) एखाद्या एरियाचा ट्रान्सफॉर्मर मध्ये बिघाड आल्यावर दुसरे ट्रान्सफॉर्मर यायला उशीर होतो. त्यामुळे जनता त्रस्त होते याचे निदान आवश्यक आहे.
8)जनते ला माणसिक त्रास दैन्याचे काम एमएसइबी करित आहे.
7) बऱ्याच ठिकाणी विद्युत पुरवठ्यांची मागणी ही वाढलेली आहे तरी जास्त लोड होत असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी ट्रांसफार्मर वाढवण्याची गरज आहे कृपया त्वरित वाढवण्यात यावे.
8) श्रीकृष्ण नगर चौक, मध्ये B3 11km उपकेंद्र स्टेशन झालेले आहेत त्याचे काम तरी सुरू करा. वाठोडा उपकेंद्रामध्ये 10 MVA चे ट्रांसफार्मर मंजूर झालेले तात्काळ लावण्यात यावे. वाठोडा उपकेंद्राच्या भाग फार मोठा आहे लोकसंख्या वाढलेली आहे लागलेले ट्रान्सफॉर्मर ची संख्या कमी आहे तरी 50 ट्रान्सफॉर्मर वाढवण्यात यावे.
9) अनमोल नगर, राधाकृष्ण नगर, हिरवी नगर, पडोळे नगर, गोपाल कृष्ण नगर देशपांडे लेआउट, शास्त्रीनगर वाठोडा गाव, इत्यादी एरिया ,
10) 1 एप्रिल पासून 15% पासून प्रमाणे वीज दर वाढ झाली त्यात जनतेची फसवणूक होत आहे तरी दर वाढ रद्द करावी कायमस्वरूपी खंडित झालेले ग्राहकांसाठी जुनी योजना व्याज माफीची सुरू करण्यात यावी. श्री विलासराव देशमुख व्याज माफी योजना सुरू करावी.
असे निवेदनाचे विषय होते. व त्यांना सांगितले की खालील समस्या त्वरित सोडवण्याची कृपा करावी अन्य तीव्र आंदोलन करण्यात येईल.
यावेळी शेखर सावरबांधे, रमण ठवकर,अफजल फारुकी, नूतन रेवतकर,शिव बेंडे, महेंद्र भांगे, रिजवान अंसारी, चिंटू महाराज, राजा बेग, अश्विन जवेरी, देवेंद्र घरडे,हाजी सोहेल पटेल, तनुज चौबे, प्रशांत बनकर, विनय मुदलीयार, वसीम लाला, डॉ. मिलिंद वाचनेकर, शरद शाहू, उषा चौधरी, राजेश माटे,आशुतोष बेलेकर, सुशांत पाली,राजु मिश्रा, दिनकर वानखेडे, सुनीता यरने, राजूसिंग चौधरी,नंदू माटे, जावेद खान, संजय आग्रे, इस्राईल अंसारी, रूद्र धाकडे, विलास मालके,दिनेश काळबांडे, पवन गावंडे, कपिल नारनवरे, हेमंत भोतमांगे, संजय आवळे, अब्दुल रहीम, चंद्रकांता जयस्वाल, शेखर पाटील, वसीम सिद्दिकी, नसिरुद्दीन, सुफी टाइगर,अब्दुल रहीम, जगजीवन खोब्रागडे, माहेश्वरी खोब्रागडे, सलीम खान, अजहर अली, जुनेद शेख, आकाश चिमनकर, इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.