संदीप कांबळे, कामठी
मौदा ता प्र 30:-केंद्रीय बोर्ड तर्फे घेण्यात येणारी इयत्ता 5 वी ची परीक्षा मौदा येथे सम्पन्न झाली या परीक्षेला तालुक्यातील विविध शाळेतील एकूण 1441 विद्याथी परीक्षेला बसले होते त्यापैकीच 1257 विद्यर्थ्यांनी आज विविध परीक्षा केंद्रावर परीक्षा दिली यामध्ये जनता विद्यालय ऑक्सफर्ड स्कूल शिर्डी साई स्कूल ज्ञानगंगा स्कूल या केंद्राचा समावेश होता तालुक्यातील विविध शाळेतील शिक्षक आणि पालक यांनी या परीक्षेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तालुक्यातून पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी परीक्षेला बसले होते
परीक्षा यशस्वी पार पडण्याच्या दृष्टीने मौदा प स गटशिक्षणाधिकारी आशा गणवीर यांनी योग्य प्रकारे नियोजन केले या कार्यात मुख्यध्यपक खंते, बेहरे , बोबडे शिक्षक , घोडेस्वार, कमलाकर ठोसरे आणि शिक्षण विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
मौदा येथे नवोदय परीक्षा सम्पन्न
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com