– सरदार वल्लभभाई पटेल आणि इंदीरा गांधी यांना अभिवादन
नागपूर :- भारताचे पहिले गृहमंत्री आणि स्वातंत्र्यानंतर देशातील अखंडता अबाधित ठेवण्यात मोलाचा वाटा उचलणारे सरदार वल्लभभाई पटेल त्यांचा जन्मदिवस आता ‘राष्ट्रीय एकता दिन’ म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने आज महावितरणचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांनी उपस्थित सर्व कर्मचा-यांना राष्ट्रीय एकतेची शपथ दिली.
महावितरणच्या विद्युत भवन येथील कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी प्रादेशिक संचालक सुहास रंगारी आणि नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आणि भारताच्या पहिल्या आणि आजपर्यंतच्या एकमेव महिला पंतप्रधान इंदीरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन आदरांजली वाहिली. याप्रसंगी अधीक्षक अभियंता हरिष गजबे, मंगेश वैद्य, प्रभारी महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) अतुल राऊत, उपमहाव्यवस्थापक (माहीती तंत्रज्ञान) प्रमोद खुळे, सहाय्यक महाव्यवस्थापक (मान संसाधन) प्रदीप सातपुते उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी सचिन लहाने, कार्यकारी अभियंता समीर शेंद्रे यांच्यासह महावितरण, अभियंते, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.