संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालय कामठी येथे दिनांक 29 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11:30 वाजता मेजर ध्यानचंद यांच्या स्मृतिप्रित्यर्थ राष्ट्रीय क्रीडा दिवस आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. विनय चव्हाण हे प्रामुख्याने उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून अरुण नायडू हे उपस्थित होते.या कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ.रेणू तिवारी, उपप्राचार्य डॉ. मनिष चक्रवर्ती, IQAC समन्वयक डॉ. प्रशांत धोंगळे,डॉ. रागिनी चाहांदे , क्रीडा विभागप्रमुख डॉ. प्रशांत बांबल,डॉ. नितीन मेश्राम, डॉ. स्वप्नील डहाट, डॉ.सतीश डुडुरे,डॉ. जयंत रामटेके,प्रा.नरेंद्र मेंढे,डॉ. सिद्धार्थ मेश्राम, डॉ. आलोक राय, डॉ. इफ्तेखार हुसेन,डॉ. संजीव शिरपूरकर, डॉ. गजाला हाशमी, डॉ. शालिनी चाहांदे डॉ. विनोद शेंडे,डॉ.तारुण्य मुलतानी,डॉ. किशोर ढोले, डॉ. विकास कामडी,डॉ. महेश जोगी, प्रा. सुरज कोंबे, डॉ. समृद्धी टापरे, प्रा.नरेंद्र मेंढे , डॉ. हिना कौसर, प्रा.स्वाती निंबाळकर, प्रा. वृन्दा पराते, डॉ .किरण पेठे,प्रा.शुभांगी माकडे,प्रा.स्वेता कायरकर, प्रा.हर्षा सिडाम ,प्रा.अनिता बैस डॉ. अनिता वानखेडे,प्रा.सुषमा वासनिक आणि बरेच वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि प्राध्यापिका हे कार्यक्रमला उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व पुष्प अर्पण करण्यात आले. त्यानंतर महाविद्यालयातील वैष्णवी कोतपल्लीवार ह्या विद्यार्थिनीने मेजर ध्यानचंद यांच्या जीवनावर प्रकाश टाकला तर श्रुतिका बनसोड ह्या विद्यार्थिनीने खेळ हा आपल्याला चांगले आरोग्य देतो. म्हणून सर्वांनी खेळाला महत्त्व आपल्या जीवनात द्यावे असे सांगितले.
महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी अरुण नायडू यांच्या हॉकी योगदानाबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.कार्यक्रमाच्या शेवटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनय चव्हाण यांनी क्रीडा विभागांनी केवळ विद्यार्थ्यांचे खेळ आयोजित करुन थांबू नये तर महाविद्यालयातील प्राध्यापकांचे सुद्धा खेळ आयोजित करावे आणि त्यांचे उत्तम आरोग्य जपावे असे सांगितले. सेंठ केसरीमल पोरवाल कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी रब्बानी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना फुटबॉल खेळात हरवल्याबद्दल त्यांचे कौतुक सुद्धा केले.या प्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी फुटबॉल या खेळाचे प्रात्यक्षिक सुद्धा खेळ सादर करून दाखविले.
क्रीडा विभागातर्फे आयोजित या कार्यक्रमात विभागप्रमुख डॉ.प्रशांत बांबल, डॉ. जयंत रामटेके, डॉ. इंद्रजित बासू, प्रा.मल्लिका नागपुरे, महेश इरपाते यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. इंद्रजीत बासू यांनी केले.तर आभार प्रदर्शन प्रा. मल्लिका नागपूरे यांनी केले.