नागपूर :- पब्लिक रिलेशन सोसायटी ऑफ इंडिया (PRSI) नागपूर चॅप्टरतर्फे शुक्रवार २१ एप्रिल २०२३ रोजी राष्ट्रीय जनसंपर्क दिन साजरा करण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रम शुक्रवार २१ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता नागपूर प्रेस क्लबच्या कॉन्फरन्स हॉल, सिव्हिल लाईन्स येथे होणार आहे.
“राष्ट्रीय जनसंपर्क दिन” दरवर्षी २१ एप्रिल रोजी एका विशेष थीमसह साजरा केला जातो. या वर्षीची थीम आहे: जी-२० आणि भारतीय मूल्ये: जनसंपर्क दृष्टीकोन
विजयालक्ष्मी बिदरी विभागीय आयुक्त नागपूर, राधाकृष्णन बी. आयुक्त नागपूर महानगरपालिका, अमितेश कुमार, पोलीस आयुक्त नागपूर, मनोजकुमार सूर्यवंशी सभापती नागपूर सुधार प्रन्यास, डॉ विपीन इटनकर जिल्हाधिकारी नागपूर आणि हेमराज बागुल संचालक. माहिती व जनसंपर्क प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
नुकतेच नागपुरात झालेल्या जी-२० बैठकीच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व मान्यवर पाहुण्यांचाही या निमित्ताने सत्कार करण्यात येणार आहे.
माजी जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांचाही समाजासाठी सातत्याने योगदान दिल्याबद्दल विशेष गौरव करण्यात येणार आहे.
पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडिया नागपूर चॅप्टरचे अध्यक्ष एस.पी. सिंग,सचिव यशवंत मोहिते आणि समन्वयक मनीष सोनी यांनी शासकीय ,नीमशासकीय, कॉर्पोरेट क्षेत्रातील जनसंपर्क अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी, जनसंपर्क कार्याशी संबंधित सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच जनसंपर्क आणि पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांनी ह्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.