राष्ट्रीय किर्तनकार मल्हारी बुवा काळे जन्मोत्सव थाटात साजरा

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

– समाजाने उच्च सुशिक्षित होण्यावर लक्ष केंद्रीत केल्यास सामाजिक उन्नती होईल – प्रा. नखाते

कन्हान :- अखिल भारतीय मांगगारोडी दलित आदि वासी भटके संघर्ष समिती महाराष्ट्र, एम.जी.एस. स्पो र्टींग शिक्षण संस्था कन्हान, विश्व विजेता सम्राट अशोका घुम्तु आर्ध घुम्मतु मुलनिवासी महासंघ नागपुर व अ.भा.भटके विमुक्त दलित महासंघाच्या सयुक्त विद्य माने राष्ट्रिय किर्तनकार मल्हारी बुवा काळे याची ९० वी जयंती जन्मोत्सव थाटात साजरा करण्यात आला.

शनिवार (दि.२३) मार्च ला अखिल भारतीय मांग गारोडी दलित आदिवासी भटके संघर्ष समिती महाराष्ट्र ,एम.जी.एस. स्पोर्टींग शिक्षण संस्था कन्हान, विश्व विजेता सम्राट अशोका घुम्तु आर्ध घुम्मतु मुलनिवासी महासंघ नागपुर व अ.भा.भटके विमुक्त दलित महासं घ यांच्या सयुक्त विद्यमाने श्री संताजी सभागृह कांद्री-कन्हान येथे ला १२ वाजता छत्रपती शिवाजी महाराज सह महापुरूषांच्या चरित्राचे गाढे अभ्यासक आणि महाराष्ट्र शासनाव्दारे महात्मा जोतिबा फुले समाजधिश पुरस्कार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र आणि लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त राष्ट्रिय किर्तनकार मा. मल्हारी बुवा काळे याचा ९० वा जन्मोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन मोतीराम रहाटे अध्यक्ष ग्रामिण पत्रकार संघ कन्हान यांचे हस्ते व बैजुजी भालेकर यांच्या अध्यक्षेत आणि प्रमुख अति थी ब्रिजलाल गायकवाड वर्धा, मल्हारी बुवा काळे यांचे पुत्र विलास काळे, आदर्श उपाध्ये लातुर, डॉ. विशेष फुटाणे सामाजिक विचारवंत, जगदिश देढे बालाघाट, डॉ. अभिविलास नखाते कोराडी, अंबादास खंडारे मा जी जि प सदस्य, कुमारबाबा पात्रे, प्रा. विष्णु चव्हाण तायवाडे महविद्यालय कोराडी, डॉ. सुंदरलाल पाटिल, अजय लोंढे माजी नगरसेवक आदी मान्यवरांच्या उप स्थित स्वातंत्र्यवीर भगतसिंग, राजगुरु व सुखदेव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शहीद दिवसी श्रध्दाजंली अर्पण करून मल्हारी बुवा काळे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.

आयोजक नेवालाल पात्रे हयानी प्रास्ताविकातुन मल्हारी बुवा काळे यांचे समाजा विषयी तळमळ व मौलिक कार्यामुळेच जयंती महोत्स व महत्व स्पष्ट केले. भटका व विखुरलेला मांगगारोडी समाज असल्याने आतातरी आपल्या मुलाबाळाना शिक्षण देऊन उच्च सुशिक्षित होण्यावर लक्ष केंद्रीत केल्यास सामाजिक उन्नती करता येईल. असे डॉ अभि विलास नखाते हयानी संबोधिले. डॉ. विशेष फुटाणे, अंबादास खंदारे, ब्रिजलाल गायकवाड, विजयभाऊ पाटिल, विलास मल्हारी काळे, प्रा. विष्णु चव्हाण, वर्षा लोंढे आदीनी मांगगारोडी समाजातील महिला उत्पीडन, बालविवाह, अनिष्ट प्रथा, संविधानिक कर्तव्य , हक्क व सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय, रोजगार संधी आणि उपलब्धता याविषयी मार्गदर्शन व समाज प्रबोधन करून मा. मल्हारी बुवा काळे यांचा जन्मोत्सव थाटात साजरा करण्यात आला. याप्रसंगी विजय पाटील, शांताराम जळते, श्रीहरी काळे लातुर, ताराचंद निंबाळकर, डायनल शेंडे, समिर मेश्राम, रघुनाथ पात्रे, सुनिल भिसे, बाळुभाऊ बिसेन गोंदिया, शंकर दुनाडे भंडारा, नंदकिशोर गजभिये, उमेश पौनिकर, शाहिर मिश्रीलाल शेंडे, वर्षा लोंढे नगरसेविका, मोनिका पौनिकर नगरसेविका न प कन्हान, दुर्गा कोचे आदि मान्यवर प्रामु़ख्याने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दिपचंद शेंडे हयानी तर आभार नेवालाल पात्रे यानी व्यकत केले. स्नेह भोजनाने सांगता करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता महेन्द्र खडसे, भुरा पात्रे, सतिश नाडे, किशोर शेंडे, दलजित पात्रे, प्रमानंद शेंडे, सावन लोंढे, रघुनाथ पात्रे, महेंन्द्र खडसे, महिपाल पात्रे, मेहेर इंचुल कर, अजित कांबळे, सन्नी पात्रे, राजेंद्र पौनिकर, सतिश नाडे, सतिश शेंडे,रवि रोकडे, रामनाथ पात्रे,संजय पात्रे, अजय इंचुरकर, वसंत पुरवले, राजन पात्रे, राजेश भिसे , नितेश पात्रे, शंभु खंदारे, रितीक शेंडे, मोनिष पात्रे, धिरज लोंढे, सावन रोकडे, शेखर पेठारे, आनेश पात्रे, निकेश पात्रे, समिर पात्रे, विनय लोंढे, रितेश पात्रे, पुरूषोत्तम इंचुरकर, शुभम पात्रे, रीतिक पात्रे, नाना पात्रे, नाना गायकवाड, सारीका शेंडे, सुनिता पात्रे,अनिता शेंडे, आतिका गायकवाड, गीता पुरवले, मिना गायक वाड, सोनु पात्रे, करुणा लोंढे, अंजली पात्रे, अंजली गायकवाड, दिव्या पात्रे, महिमा पात्रे, शिवानी खडसे, अनिशा खडसे, मनिषा खडसे, वर्षा पात्रे सह समाज बांधवानी मौलाचे सहकार्य केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पर्यावरणपूरक होली मनाएं

Sun Mar 24 , 2024
– पुलक मंच परिवार ने की अपील नागपूर :- अखिल भारतीय पुलक मंच परिवार राष्ट्रीय जैन महिला जागृति मंच शाखा महावीर वार्ड नागपूर द्वारा रविवार की सुबह पं. बच्छराज व्यास चौक पर पर्यावरणपुरक होली मनाने के लिए जन जागरण किया गया| होली पर्व रंगो और उल्लास का पर्व है रंग से रंग मिले या ना मिले परन्तु मन से मन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com