स्वच्छ भारत अभियान : प्लास्टिक विरुध्द मनपाची धडक कारवाई

नागपूर : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवारी (ता.29) 4 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 20 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात धंतोली आणि सतरंजीपूरा झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 2 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 10,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 3 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल धंतोली झोन अंतर्गत प्रभाग न.17, कॉटन मार्केट येथील सम्रूधी आगरा या दुकानाविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सतरंजीपूरा झोन अंतर्गत शहिद चौक, इतवारी येथील अग्रवाल किराणा शॉप या दुकानाविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.त्याचप्रमाणे लक्ष्मीनगर झोन अंतर्गत इंद्रपथ नगर येथील विजय देशमुख यांच्याविरुध्द बांधकाम साहित्याचा प्रचंड कचरा रस्त्यालगत पसरविल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. लकडगंज झोन अंतर्गत गुकुल नगर, कळमना मंदीर जवळ, कामठ रोड येथील मोहित स्क्रॅप या दुकानाविरुध्द रस्त्यालगत भंगार पसरविला आणि आजुबाजुचा परिसर घाण केल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

 

 

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com