नारी विजय संकल्प यात्रा

नागपूर :- दिनांक 16 नोव्हेंबर विधानसभा निवडणूक आता अंतिम टप्प्यात आहे.महाराष्ट्रातील महिलांसाठी महायुतीने केलेली कामगिरी दमदार असून 17 नोव्हेंबर ते 19नोव्हेंबर पर्यंत संपूर्ण विदर्भात महिलांची रैली आणि पदयात्रा नारी धमनी तिजन संकल्प यात्रा आयोजित केली आहे. माजी महापौर अर्चना डेहनकर ‘यांनी प्रेस कॉन्फरन्स मध्ये संबोधित केले की महिलांचा विकास हा महाराष्ट्राच्या प्रगतीचा गाभा आहे. महायुती सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी, सुरक्षिततेसाठी, आणि स्वावलंबनासाठी अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. मात्र महाविकास आघाडीने आपल्या कार्यकाळात महिलांच्या विकासाच्या दिशेने कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही.

आजच्या या प्रेस कॉन्फरन्स मध्ये महिला अध्यक्ष प्रगती पाटील यांनी संबोधित केले की,महिला साठी राबविण्यात महायुती सरकारच्या महिला कल्याण योजनां, महिलांसाठी उचललेल्या ठोस पावलांमुळे आज महाराष्ट्रातील तमाम महिला महायुतीसोबत आहोत.महिला सक्षमीकरणासाठी महायुतीचे योगदान जगजाहीर असून यांनी महिला साठी सुरु असलेल्या योजनाचा आढावा देत संबोधित केले कि,सुरक्षेसाठी फास्ट ट्रॅक कोर्ट्स, सुरक्षितता उपाय, महिला हेल्पलाइन नंबर (181): 24×7 आपत्कालीन मदत,तसेच कन्या शिखर योजना, मुलींना मोफत सायकल योजना, ग्रामीण भागातील मुलींना शिक्षणासाठी सायकलींचे वितरण,व्यावसायिक शिक्षणासाठी विशेष प्रशिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र,मातृत्व लाभ योजने गरोदर महिलांना आर्थिक मदत, मोफत आरोग्य तपासणी,महिला आरोग्य केंद्रे,ग्रामीण भागात महिलांसाठी मोफत औषधोपचार आणि सल्लामसलत,स्वच्छता अभियानात ग्रामीण भागातील महिलांसाठी मोफत सॅनिटरी पॅड वितरण योजना,स्वरोजगार आणि आर्थिक स्वावलंबन महिला बचत गटांसाठी कर्ज सुलभता, स्वयंरोजगारासाठी बचत गटांना बिनव्याजी कर्जे, महिला स्टार्टअप्सला प्रोत्साहन,उ‌द्योजक महिलांसाठी विशेष अनुदान योजना,कृषी आणि ग्रामीण विकासातील योगदान, शेतकरी महिलांसाठी सबसिडी योजना,महिलांना शेतीसाठी अनुदाने आणि प्रशिक्षण,सेंद्रिय शेतीसाठी मदत,तसेच आनंदाचा शिधा वाटप, महिलांना तीन सिलेंडर फ्री देण्यात येत आहे.तेच महाविकास आघाडीच्या महिलांविरोधी धोरणांचा पर्दाफाश महिला सक्षमीकरणाबाबत अपयश,महिला आरोग्य सेवा अपुरी,शैक्षणिक धोरणांमध्ये उदासीनता,मुलीना मोफत शिक्षण देण्याच्या योजना कागदावरच राहिल्या. विकास आघाडीच्या काळात महिला सुरक्षेचे प्रमाण घटले. नीण भागातील महिला बचत गटांना अपेक्षित सहाय्य मिळाले नाही.महायुती सरकारने नेहमीच महिलांच्या हिताला प्राधान्य दिले आहे. महिलांचे सक्षमीकरण हे केवळ घोषणांपुरते न ठेवता, प्रत्यक्ष अमलात आणले आहे. म्हणूनच, महाराष्ट्रातील महिला आज महायुतीच्या पाठीशी ठामपणे उभ्या आहेत. महिलांच्या पाठिंब्यामुळेच महाराष्ट्राला एक समृद्ध आणि प्रगत राज्य बनवण्याच्या दिशेने आम्ही पुढे जात आहोत.” आणि म्हणूनच संपूर्ण विदर्भामध्ये ६१ विधानसभांमध्ये 16,17,18 नोव्हेंबर झिंगा बाई टाकळी पश्चिम, पूर्व,मध्य, उत्तर दक्षिण, दक्षिण पश्चिम या तीन दिवसांमध्ये महिलांच्या पदयात्रा आणि रॅली काढून या महायुतीच्या सरकारला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि आमचे लाडके देवा भाऊ यांना समर्थन देणार आहेत. प्रमुख उपस्थिती महामंत्री मनीषा काशीकर,प्रीती राजदेरकर,निकिता पराये, वर्षा चौधरी, ज्योती देवघरे कविता सरदार उपस्थित होत्या.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणच्या कार्यकारी अध्यक्षपदी न्या. भूषण गवई यांची नियुक्ती

Sat Nov 16 , 2024
गडचिरोली :-  राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (NALSA) च्या कार्यकारी अध्यक्षपदी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अधिकारानुसार, विधी सेवा प्राधिकरण अधिनियम, 1987 च्या कलम 3 च्या उपकलम (2) च्या कलम (ब) अंतर्गत 11 नोव्हेंबर 2024 पासून लागू झाली आहे. या संदर्भातील अधिसूचना भारत सरकारच्या न्याय आणि विधी मंत्रालयाने 8 […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!