नागपूर येथे ९ आणि १० डिसेंबरला नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन

– महारोजगार मेळाव्यात चाळीस हजारपेक्षा जास्त जागा भरल्या जाणार – कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

– नोकरी इच्छुक उमेदवार, स्टार्टअप्स, इनवेस्टर्स आणि इनकुबेटर्सना सहभागी होण्याचे आवाहन

मुंबई :- महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य,रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने ‘नमो महारोजगार मेळाव्याचे’ दिनांक ९ आणि १० डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजता, जमनालाल बजाज प्रशासकीय भवन, नागपूर विद्यापीठ, नागपूर येथे आयोजन करण्यात आले आहे. ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमा अंतर्गत आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार योजनेद्वारे हा महा-मेळावा होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या मेळाव्यात ७०० नियोक्त्यांच्या माध्यमातून तब्बल ४० हजारहून अधिक जागांसाठी पदभरती होणार असून याचा लाभ घेण्याच आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.

नमो महारोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी www. rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. नमो महारोजगार बटनवर क्लिक करून, विचारलेली माहिती संपूर्णपणे भरून नोंदणी पूर्ण करावी.

मंत्री लोढा म्हणाले की, या महारोजगार मेळाव्यात स्टार्टप्स, इनकुबेटर्स आणि इनवेस्टर्स तसेच नामांकित कंपन्या सहभागी होणार असून नागपूर जिल्ह्यातील दहावी, बारावी, आयटीआय, पदविका, पदवीधर, पदव्युत्तर शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांच्या तेथेच मुलाखती घेवून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. विभागाच्या वेगवेगवेगळ्या योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी इथे स्टॉल्सही उभारण्यात येणार आहेत. स्टार्टप्स उभारण्यासाठी लागणाऱ्या सर्व सोयीसुविधा इनोव्हेटर्सच्या सगळ्या शंकांच निरसणही केले जाणार आहे.एकाच छताखाली इनोव्हेटर्स, इनकुबेटर्स आणि इनवेस्टर्स यांच्यासाठी हा मेळावा पर्वणी ठरेल. उद्योगाला लागणारे मनुष्यबळ, स्टार्टअप्ससाठी मार्गदर्शन, इन्व्हेस्टर्ससाठी गुंतवणुकीच्या संधी या मेळाव्यात तयार होतील. यासाठी अधिकाधिक संख्येत स्टार्टअप्स, इनवेस्टर्स आणि इनकुबेटर्सनी या मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन मंत्री लोढा यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नवउद्योजकांना एकाच छताखाली मिळणार स्टार्टअप एक्सपोमध्ये विविध माहिती - कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

Thu Dec 7 , 2023
– नागपूर येथे होणा-या नमो महारोजगार मेळाव्यात स्टार्टअप एक्सपोचे’आयोजन मुंबई :- कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागार्तर्फे तरुण आणि नवउद्योजकांच्या कल्पनांना चालना देण्यासाठी नागपूर येथे होणाऱ्या ‘नमो महारोजगार मेळाव्यात, स्टार्टअप एक्सपोचे आयोजन ९ आणि १० डिसेंबरला करण्यात येत आहे. जमनालाल बजाज प्रशासकीय भवन, नागपूर विद्यापीठ, नागपूर येथे सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत या एक्सपोचे आयोजन करण्यात आले असून […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!