– 68 उमेदवारांकडून 137 अर्जांची उचल
यवतमाळ :- जिल्ह्यातील 7 पैकी 5 विधानसभा मतदारसंघात आज एकून 9 नामांकन अर्ज दाखल झाले. दोन मतदारसंघामध्ये अद्याप एकही अर्ज दाखल झाला नाही. नामांकनाच्या तिसऱ्या दिवसी एकून 68 उमेदवारांनी 134 अर्जांची उचल केली.
आज दाखल झालेल्या अर्जांमध्ये दिग्रस विधानसभा मतदारसंघात संजय दुलीचंद राठोड (शिवसेना), रत्ना प्रतापसिंग आडे (अपक्ष) यांनी अर्ज भरला. राळेगाव विधानसभा मतदारसंघात प्रा.डॅा.अशोक उईके (भाजप) यांनी अर्ज भरला. यवतमाळ विधानसभा मतदारसंघात एकून 4 नामांकन अर्ज दाखल झाले. त्यात डॅा.किशोर निळकंठराव खडसे (अपक्ष), नंदु श्रीपाद उर्फ श्रीपंत घुगे (अपक्ष), मोहन गोविंदराव भोयर (अपक्ष), बिपीन अनिल चौधरी (अपक्ष) यांचा समावेश आहे.
आर्णी विधानसभा मतदारसंघात नैना शैलेश ठाकुर (अपक्ष) तर उमरखेड विधानसभा मतदारसंघात बाळासाहेब यशवंत रास्ते (बळीराजा पार्टी) यांनी त्या-त्या विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज दाखल केले.