नागपूर ग्रामीण पोलीसांची व्हिडीओ गेमींग पार्लरवर धडक कारवाई एकूण ७९,४००/- रू. चा माल जप्त

नागपूर :- गुप्त बातमिदाराकडुन खबर मिळाली की, मौजा टेंभरी येथील महाकाल ट्रेडर्स बिल्डिंग मटेरीयल येथील दुकानाचे बाजुला असलेल्या एका शटर दुकानामध्ये हनुमंत सोनोने हा व्हिडीओ गेम पार्लर मधील इलेक्ट्रॉनीक मशिनवर त्याचे फिरत्या आकड्याचे आधारे तेथे येणान्या ग्राहकांकडून नगदी पैसे रक्कम स्विकारून त्या मोबदल्यात त्यांना तेवढ्या रकमेची चाबी भरून देवुन स्वतःचे आर्थीक फायद्याकरीता पैज लावून हारजितना जुगार खेळीत आहे. अशा मिळालेल्या माहितीवरून पोलीस पथकाने टेंभरी चौकालगत असलेल्या नमुद ठिकाणी छापा जुगार कायद्यान्वये रेड करुन कारवाई केली ती पुढीलप्रमाणे.

नमुद ठिकाणी रेड दरम्यान आरोपी हनुमंत आनंदराव सोनोने, वय ४४ वर्षे, रा. शुभम लाकडे यांने घरी किरायाने टेंभरी ता. हिंगणा जि. नागपुर हा दुकानात आलेले ग्राहक आरोपी सुशिल गजानन भजभुजे, वय २५ वर्षे, रा. वार्ड नं. ०३ टेंभरी ता. हिंगणा जि. नागपुर तसेच अमोल कवडुजी उईके वय २६ वर्षे रा. झेंडा चौक, वायगांव गोंड रोड सुमुद्रपुर ता. समुद्रपुर जि. वर्धा यांचेकडुन पैसे स्वीकारुन दुकानात असलेल्या इलेक्ट्रीक मशिनच्या सहाय्याने न्यावी फिरवुन हार जितचा जुगार खेळताना मिळुन आला. त्यानंतर पंचनामा कारवाई करून सदर शटरच्या दुकानातुन वेगवेगळ्या कंपनीच्या ०६ ईलेक्ट्रॉनीक मशिन, त्यांच्या चाख्या व जुगारचे नगदी १४००/- रू. असा एकुण जुगार कि. ७९,४००/- रू. चा माल जप्त करण्यात आला. दरम्यान सदर प्रकरणी अधिक चौकशी केली असता सदरच्या व्हिडीओ पार्लरचे मालक हे शुभम जगदीश चचाने रा. टेंभरी व बाबु शेख रा. बुटीबोरी असल्याचे निष्पन्न झाले. सदर प्रकरणी आरोपी हनुमंत आनंदराव सोनोने, वय ४४ वर्षे, रा. शुभम लाकडे यांचे घरी किरायाने टेंभरी ता. हिंगणा जि. नागपुर, सुशिल गजानन भजभुजे, वय २५ वर्षे, रा. वार्ड नं. ०३ टेंभरी ता. हिंगणा जि. नागपुर, अमोल कवडुजी उईके वय २६ वर्षे रा. शेंडा चौक, वायगांव गोंड रोड सुमुद्रपुर ता. समुद्रपुर जि. वर्धा, व्हिडीओ पार्लरचे मालक हे शुभम जगदीश चचाने रा. टेंभरी व बाबु शेख रा. बुटीबोरी या सवाविरुध्द महाराष्ट्र जुगार अधिनियम तसेच भारतीय दंड संहितेप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधिक्षक रमेश धुमाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी पुजा गायकवाड यांचे मार्गदर्शात ठाणेदार सहा. पोनि राजीव कर्मलवार, सहा. पोनि भुजबळ, पोलीस उप निरीक्षक खोत तसेच पोलीस अंमलदार विनोद अहिरकर, विनायक सातव, श्रीकांत गौरकार यांनी केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पत्रकार निखिल वागळेवरील हल्ल्याचा निषेध - माजी अध्यक्ष संदीप कांबळे

Mon Feb 12 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रसृष्टीला राज्य घटनेने स्वातंत्र्य दिले आहे.जनतेचा आवाज शासनापर्यंत पोहोचविण्याचा अधिकार घटनेनेच पत्रकारांना दिले आहे.परंतु दहशत माजवून ,हल्ला करून पत्रकारांच्या अधिकारावर घाला घालण्याचे काम सुरू आहे.पुण्यात रात्री ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर प्राणघातक भ्याड हल्ला झाला या घटनेचा निषेध करण्यात येत असून शासनाने अशा हल्लेखोर आणि दहशत निर्माण करणाऱ्या प्रवृत्तीवर कडक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com