भरडधान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय द्या – हेमंत पाटील

– आधारभूत किंमत निश्चित करुन देण्याची मागणी

मुंबई – देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात बळीराजाला सुगीचे दिवस आले आहेत. पंतप्रधानांचे नेतृत्व देशासह जगाला नवीन दिशा देणारे आहे, हे विशेष. यंदा भारताच्या आग्रहाखातर संपूर्ण जग ‘आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष’ म्हणून साजरा करीत आहे. अशात देशातील भरडधान्य उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतमालाची आधारभूत किंमत निश्चित करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची मागणी इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी केली आहेत. यासंदर्भात लवकरच पंतप्रधानांसोबत पत्रव्यवहार करणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली.

देशाला यंदा जी-२०चे अध्यक्षपद मिळाले आहे. यानिमित्त विविध राज्यातील अनेक शहरांमध्ये आंतरराष्ट्रीय बैठकांचे आयोजन करण्यात येईल. या बैठकांमध्ये भोजन व्यवस्थेत भरडधान्याने बनलेल्या व्यंजनाची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. या पुढाकाराने देखील भरडधान्य आणि त्यापासून बनलेल्या व्यंजनाला जागतिक ओळख मिळले,असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. भारतात १४० लाख हेक्टरवर जवळपास १.४५ लाख टन बाजरीचे उत्पादन घेतले जाते. तर,जागतिक परिस्थितीत जवळपास ८६३ लाख टन बाजरीचे उत्पादन घेतले जाते. जगातील १३१ देशांमध्ये भरडधान्य पिकवले जाते. बाजरी, ज्वारी, नाचणी, कांगणी, कोडो, कुटकी, चेना त्यादी पिकांचा त्यात समावेश आहे.

अशात भरधान्य उत्पादन शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी सरकारने आधारभूत किंमत कायदा करून या पिकांच्या उत्पादनांची सरकारी व खासगी खरेदी आधारभूत किंमतीवर करणे बंधनकारक केले तर वर्षांनूवर्ष मध्यस्थांकडून होत असलेली लूटीपासून या शेततकऱ्यांची सुटका होईल. यासोबत बेकरी, ब्रेड, नूडल, बिस्टिके इत्यादी खाद्यपदार्थांमध्ये किमान १० वितरणासोबत १५-२०% भरड पौष्टिक धान्याचा वापर बंधनकारक केला पाहिजे, असे मत पाटील यांनी व्यक्त केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विद्यापीठीय व महाविद्यालयीन कर्मचा-यांचे बेमुदत आंदोलन शंभर टक्के यशस्वी, विद्यापीठांसह बारावीच्या परीक्षा प्रभावित

Tue Feb 21 , 2023
शासनाने विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन मागण्या मान्य कराव्यात महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीची मागणी अमरावती :- महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचा-यांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी सेवक संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वात 20 फेब्राुवारीपासून बेमुदत कमबंद आंदोलन सुरू असून विद्यापीठ व महाविद्यालयांमधील सर्व कर्मचारी या आंदोलनात सहभागी झालेले आहेत. त्यामुळे कर्मचारी संघटनेचे आंदोलन शंभर टक्के यशस्वी झाले […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com