नागपूर शहरात खून आणि इतर गंभीर गुन्हे वाढले, २०२२ च्या तुलनेत २०२३ चे चित्र वाईट

नागपूर :- गृहमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शहरात २०२२ या वर्षाच्या तुलनेत वर्ष २०२३ मध्ये खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, चोरीसह इतरही काही गंभीर गुन्हे वाढले आहेत. परंतु गेल्या आठ वर्षांची सरासरी दाखवत गुन्हे कमी झाल्याचा दावा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केला आहे.

पोलीस भवन येथे शुक्रवारी झालेल्या अनौपचारिक चर्चेत पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, २०२२ मध्ये शहरात गंभीर संवर्गातील गुन्हे खूपच कमी करण्यात पोलिसांना यश आले होते. २०२३ मध्येही ही स्थिती कायम आहे. २०२२ मध्ये शहरात ६५ खून झाले होते, २०२३ मध्ये ७३ खून झाले. २०२२ मध्ये शहरात १०२ खुनाचे प्रयत्न तर २०२३ मध्ये ११० खुनाचे प्रयत्न झाले. २०२२ मध्ये शहरात १६७ दरोडे तर २०२३ मध्ये २३६ दरोड्यांच्या घटना घडल्या. २०२२ मध्ये शहरात ७३२ चोऱ्या तर २०२३ मध्ये ८३६ चोऱ्या झाल्या. २०२२ मध्ये २५० बलात्कार तर २०२३ मध्ये २४७ बलात्कार झाले. इतरही गुन्ह्यात कमी-अधिक वाढ वा घट झाली आहे.

शहरात २०२२ मध्ये ७ हजार ७९६ गुन्हे घडले तर २०२३ मध्ये ९ हजार २४५ गुन्हे नोंदवले गेले. २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये किंचित गुन्हे वाढलेले दिसत असले तरी आरोपी पकडण्याचे प्रमाण २०२३ मध्ये वाढले आसून २०२२ मध्ये गुन्हे खूपच कमी राखण्यात पोलिसांना यश आले होते. हे गुन्हे खूपच कमी असल्याने यंदा थोडी वाढ दिसत असल्याचे अमितेश कुमार यांनी सांगितले. तर यंदा मोबाईल मिसिंगऐवजी मोबाईल चोरीच्या नोंदी केल्याने चोऱ्या वाढलेल्या दिसत असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यातच गेल्या आठ वर्षांची सरासरी काढल्यास शहरात वर्षाला ९५ खून व्हायचे. ही संख्या २०२३ मध्ये ७३ आल्याने गुन्हे गेल्या आठ वर्षांची सरासरी करता कमी झाल्याचे अमितेश कुमार यांनी सांगितले. शहरातील निम्मे खून कौटुंबिक कलहातून झाले. या खुनाचा छडा लावणे कठीण असते. परंतु पोलिसांनी त्यात चांगले यश मिळवले. तर बलात्काराच्या सर्वाधिक घटना ओळखीच्या व्यक्तीकडून घडल्याचे निदर्शनात आल्याचेही अमितेश कुमार म्हणाले. यावेळी शहर पोलीस खात्यातील सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जिल्ह्यात शिवराज्याभिषेक महानाट्य आणि महासंस्कृती महोत्सवाचे लवकरच आयोजन

Sat Dec 30 , 2023
नागपूर :- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त जिल्ह्यात महानाट्याचे आयोजन तसेच पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. आज यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी आयोजनाचा आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहामध्ये या संदर्भात आयोजन समितीची बैठक घेण्यात आली. जिल्हाधिकारी यांच्यासह जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्य शर्मा व विविध विभागाचे प्रमुख उपस्थित […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!