नागपूर :- शहर पोलीसांना नागपूर शहरातील पोलीस ठाणे हद्दित मुदाका अन्वये १३ केस व एन.डी.पी.एस. अन्वये २३ केस असे एकूण १६ केसेसमध्ये एकुण १३ इसमावर कारवाई करून रु. १३,८२०/- चा माल जप्त करण्यात आला. तसेच, जुगार कायदा अन्यये ३ केसेस मध्ये एकूण १३ इसमावर कारवाई करून रु. ४३,८५६/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
वाहतुक शाखा पोलीसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमाखाली एकूण २,९५२ वाहन चालकावर कारवाई करून एकूण रू. ५.९५,२५०/- रू जोड शुल्क वसूल केले आहे. वरील सर्व मोहीमा एकत्रितरित्या नागपूर शहर पोलीसातर्फे राबविण्यात आल्या असून या पुढेही प्रभावीपणे कारवाई करण्यात येणार आहे. वाहन चालकांनी वाहन चालवितांना वाहनासंबंधी नियम पाळून सर्व कागदपत्रे जवळ बाळगावित असे नागरीकाना आवाहन करण्यात येत आहे.