संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
-महिला सक्षम तर देश सक्षम
कामठी :- प्रा.अवंतिका रमेश लेकुरवाळे सभापती महिला बाल कल्याण समिती जिल्हा परिषद नागपुर यांच्या संकल्पनेतून आणि श्री गजानन शिक्षण सेवा संस्था नागपूर द्वारा संचालित संघर्ष जगण्याचा प्रशिक्षण 2023 या उपक्रमांतर्गत महिलांच्या सक्षमीकरणासाठी आज दि. १२ मे २०२३ ला श्री. सत्य साई विद्यामंदिर, नरसाळा येथे निशुल्क शिवणक्लास प्रशिक्षण बॅच-३ आणि ब्युटी पार्लर बॅच-२ चे उद्घाटन प्रा.अवंतिका रमेश लेकुरवाळे सभापती म.बा.क. समिती जि.प. यांनी केले.
तसेच जिजामाता नगर तरोडी (खु) येथील सुरू केलेल्या व्दितीय बॅच चे योग्यरीत्या प्रशिक्षण पूर्ण होऊन त्या बॅच मधील सर्व महिलांना शिवणक्लास उत्तीर्ण झाल्याचे निःशुल्क प्रमाणपत्र व मार्कशिट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
प्रसंगी नरेंद्र ढवळे (अध्यक्ष स्व.दौलतराव शि.से. संस्था) , निलेश सोनटक्के (मुख्याध्यापक श्री.सत्यासाई विद्यामंदिर) लक्ष्मी रामन (सदस्य श्री सत्य साई संघटन) , नंदा ठाकरे प्राचार्या प्रिआंती इंग्लिश स्कूल अँड ज्यू. कॉलेज तरोडी (बू) आणि नरसाळा येथील समग्र महिला उपस्थितीत होत्या. निःशुल्क प्रशिक्षण देऊन प्रमाणपत्र व मार्कशिट दिल्याबद्दल जिजामाता नगर तरोडी (खु) येथील सर्व महिलांनी प्रा.अवंतिका रमेश लेकुरवाळे याचे आभार मानले.