अवैध बांधकामावर मनपाची मोठी कारवाई, ४ बांधकामावर हातोडा

चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेने अवैध बांधकामावर कारवाई केली असुन कोनेरी तलाव,बाबुपेठ व नागपूर रोड येथील एकुण ४ बांधकामे जेसीबी व अतिक्रमण पथकाच्या मदतीने काढण्यात आले आहे.      कोनेरी तलाव जवळील जेलच्या मागील परीसरात गफ्फुर वल्द शेख अलमुद्दीन यांचे घराचे अवैध बांधकाम, हुडको कॉलनी बाबुपेठ येथील चरण पोरटे यांचे पहिल्या माळ्यावरील अवैध बांधकाम,सुरेश डाबरे यांचे टिनाच्या शेडचे व बाथरूमचे अवैध बांधकाम व नागपुर रोडवरील अमित व अभिषेक येरगुडे यांचे २ मजली इमारतीचे अंदाजे क्षेत्रफ़ळ ११०० चौरस फूटाचे अवैध बांधकाम असल्याचे तक्रार महानगरपालिका प्रशासनास प्राप्त झाली होती.

मनपा अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता बांधकाम हे अवैधरीत्या केले असल्याचे आढळून आले. त्यामुळे अतिक्रमणधारकांना मनपा कार्यालयामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ मधील कलम ५३ अन्वये नोटीस बजाविण्यात आली तसेच बांधकाम स्वतः हुन हटविण्याविषयी वारंवार सूचना देण्यात आल्या. परंतु अवैध बांधकामधारकांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने मनपा अतिक्रमण निर्मूलन पथकाद्वारे पोलीस पथकाच्या संरक्षणात बांधकाम काढण्यात आले.

शहरातील अवैध बांधकामाची वाढती प्रकरणे पाहता आयुक्त यांनी अश्या बांधकामांवर सक्तीने कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने तिन्ही प्रभागाचे सहायक आयुक्त यांनी कार्य सुरु केले असुन अवैध बांधकाम – अतिक्रमण यांच्यावर सातत्याने कारवाई केली जाणार आहे. सदर कारवाई आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील व उपायुक्त अशोक गराटे यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात सहायक आयुक्त सचिन माकोडे,नरेंद्र बोभाटे, सहायक नगर रचनाकार सारिका शिरभाते,राहुल भोयर,आशिष भारती यांनी केली. यावेळी मनपा अधिकारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थीत होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी नियंत्रण कक्ष सज्ज ठेवा - विजयलक्ष्मी बिदरी

Fri May 19 , 2023
नागपूर :- अतिवृष्टी व महापुरामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा स्तरावर आपत्ती व्यवस्थापन आराखड्या नुसार विविध विभागांनी समन्वयाने प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी तसेच जिल्हा स्तरावर नियंत्रण कक्ष सज्ज व सतर्क ठेवण्याच्या सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज दिल्या. नागपूर विभागात मान्सुनपूर्व तयारी व नैसर्गिक आपत्ती कालखंडात करावयाच्या उपाय योजनांबाबतचा आढावा विभागीय आयुक्तांनी आज घेतला. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना त्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com