नागपूर शहराच्या शाश्वत विकासासाठी मनपा कार्यतत्पर

– शहरातील सिमेंट काँक्रीट रस्त्यांचे कार्य प्रगतीपथावर

नागपूर :- नागपूर शहराच्या शाश्वत विकासासह नागरिकांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावण्यासाठी नागपूर महानगरपालिका कार्यतत्पर आहे. शहरातील सिमेंट काँक्रीट रस्त्यांचे कार्य प्रगतीपथावर असून, नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात मनपा क्षेत्रातील विकास कार्य आणखी जोमाने केल्या जात आहे.

नागपूर महानगरपालिका हद्दीत विविध यंत्रणेसह मनपाचे एकूण ३९४६.५७४ कि.मी. लांबीचे रस्ते असून, त्यापैकी १२ मी. किंवा त्यापेक्षा जास्त रुंदीचे जवळपास ३०० कि.मी. लांबीचे रस्ते आहेत. नागपूर शहरात मनपाच्या अखत्यारीत एकूण २४०६ कि.मी लांबीचे रस्ते आहेत. त्यापैकी १७१६ कि.मी. ( ७२ टक्के लांबी )चे रस्ते डांबरी आहेत तर व ६९० कि.मी. (२८ टक्के लांबी) चे रस्ते कॅाक्रीट आहेत. नागपूर शहरातील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी तसेच दरवर्षी डांबरीकरणाच्या कामांवर होणारा खर्च कमी करण्यासाठी डांबरी रस्त्याचा पृष्ठभाग हा सिमेंट काँक्रीटचा करण्यात येत आहे.

मनपाने स्वनिधितून सिमेंट रस्ते प्रकल्प टप्पा- १ हाती घेण्यात आला असून, या प्रकल्पातंर्गत १७ कि.मी. लांबीच्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. अशात शहर सिमेंट कॉंक्रीट रस्ते प्रकल्प टप्पा- ४ करिता शासनाने दिनांक १ डिसेंबर २०२३ रोजी रस्त्याच्या यादीला मान्यता प्रदान केली आहे तर शासनाद्वारे नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या परिक्षेत्रात अधिसुचीत विशिष्ट नागरी सेवा व सुविधा पुरविणे अंतर्गत रु. ३०० कोटी मनपाला प्राप्त आहेत. त्यानुसार रु. ३०० कोटी रक्कमेच्या एकूण २३.४५ कि.मी. लांबीच्या रस्त्याचा प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी जिल्हाधिकारी नागपूर यांच्या कडे सादर करण्यात आला असून, मंजुरी प्राप्त झाल्यावर कामाच्या निविदा मागून सिमेंट काँक्रीट रस्त्यांचे कामे करण्यात येणार आहे.

याशिवाय शासन, नागपूर सुधार प्रन्यास व नागपूर महानगरपालिका यांचे सम आर्थिक सहभागातून सिमेंट रस्ते प्रकल्प टप्पा- २ अंतर्गत एकूण रु. ३०० कोटी रक्कमेचे प्रकल्प हाती घेण्यात आले असून, या प्रकल्पांतर्गत एकूण ५२ कि.मी. लांबीचे रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्यात आले आहेत. तर सिमेंट रस्ते प्रकल्प टप्पा- 3 अंतर्गत रु. ३०० कोटी रक्कमेचे प्रकल्प हाती घेण्यात आले असून, या प्रकल्पांतर्गत ३० कि. मी. लांबीच्या रस्त्याचे सिमेंट कॉक्रिटीकरण करण्यात आले आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बाबासाहेबांचा इतिहास जिवंत राहावा, ते संघर्षाचे निवासस्थान स्मारक बनावे - उत्तम शेवडे

Fri Dec 8 , 2023
नागपूर :-भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1912 ते 1934 पर्यंतचा उमेदीचा काळ शिक्षण, संघर्ष व आंदोलनात ज्या ठिकाणी घालवला तसेच 17 डिसेंबर 1919 ला राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी बाबासाहेबांना जिथे भेट दिली ते मुंबई परळच्या बी आय टी चाळीतील निवासस्थान राष्ट्रीय स्मारक बनले पाहिजे असे मनोगत आंबेडकरी अभ्यासक उत्तम शेवडे यांनी व्यक्त केले. उत्तम शेवडे हे मुंबईतील डॉक्टर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com