मनपा झोन निहाय गणेश मंडळ परवानगी सुविधा केंद्र सुरू 

– अधिकाऱ्यांमार्फत ऑनलाईन प्रणालीचे नागरिकांना मार्गदर्शन

नागपूर :- गणेशोत्सव म्हटलं तर सर्वत्र उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण असते असे असताना नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा याकरिता विविध पाऊल उचलण्यात येत आहेत. त्यात गणेशोत्सवासाठी गणेश मंडळांना घ्याव्या लागणाऱ्या विविध परवानगीसाठी होणारा त्रास कमी करण्याकरिता मनपाद्वारे गणेश मंडळांना सोयीस्कर अशी ऑनलाईन प्रणाली अंमलात आणली असून, सर्व दहाही झोन कार्यालयात एक खिडकीची व्यवस्था अर्थात गणेश मंडळ परवानगी सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहेत.

नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार व अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनात शहरातील गणेशमंडळांना घरबसल्या परवानगी मिळावी याकरिता सोयीस्कर व सुलभ अशी ऑनलाईन प्रणाली अंमलात आणली आहे. याशिवाय मनपाच्या दहाही झोन कार्यालयात एक खिडकीची व्यवस्था अर्थात गणेश मंडळ परवानगी सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहेत. या गणेश मंडळ परवानगी सुविधा केंद्रावर नागपूर महानगरपालिका, पोलीस विभाग, अग्निशमन विभाग आदी विभागांचे अधिकारी, कर्मचारी नागरिकांच्या सेवेत कार्यरत आहेत. केंद्रांवर अधिकारी गणेशोत्सव परवानगी करिता नागरिकांना मार्गदर्शन करीत असून, ज्यांना ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज करण्यास त्रास जात आहे अशा नागरिकांना सर्तोपारी मदत करीत आहेत.

उपअभियंता यांच्या संपर्क क्रमांकाची यादी खालील प्रमाणे

अभिजित नेताम 9673999750

पी. जी. मोकाडे 9923388095

पी. एम. आगरकर 9823128271

पी.जे. आसलकर 9923209423

गिरीश लिखर 9890918039

प्रवीण कोठांगळे 9823062603

एन. एस. बोबडे 9823274661

देवेंद्र भोवते 9764336466

सुनील गजभिये 9923388044

प्रशांत सोनकुसळे 9823316644

झोन निहाय पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्क क्रमांकाची यादी खालील प्रमाणे:

लक्ष्मीनगर झोन 1:- राहुल बेलदार: 771590859

धरमपेठ झोन क्र. 2:- विकास तिडके: 9637402411

हनुमान झोन क्र. 3:- पंकज बावणे 8390458401

धंतोली झोन क्र. 4 :- शेख 9545170806

नेहरूनगर झोन क्र. 5:- प्रवीण वाकडे 7588537192

गांधीबाग झोन क्र. 6:- बिस्मिल्ला खान 9823092627

सतरंजीपुरा झोन क्र. 7:-युवराज वाघमारे 8975874100

लकडगंज झोन 8:- आदर्श भंडारे 7758097101

आशीनगर झोन 9:- सुजित चव्हाण 9011051150

मंगळवारी झोन 10:- संतोष खांडेकर 8329388805

अशी करा नोंदणी

ऑनलाईन गणेश मंडळ नोंदणी करण्यासाठी मनपाच्या https://nmcnagpur.gov.in/RTS/ws/user/login.do या संकेतस्थळावर जा ‘रजिस्टर’वर क्लिक करून नाव, आडनाव, ईमेल आयडी, मोबाईल क्रमांक टाका व सेंड ओटीपी वर क्लिक करा. ओटीपी नोंदवून रजिस्टरवर क्लिक करा. नोंदणी झाल्यानंतर साईन इन मध्ये पुन्हा मोबाईल क्रमांक नोंदवा ओटीपी प्राप्त करून तो नोंदवा.

मनपाच्या संकेतस्थळाचे डॅशबोर्ड ओपन होईल. यात ‘गणेश मंडळ परवानगी’ वर क्लिक करा. परवानगी मिळविण्याची पद्धती अटी व शर्ती वाचून ‘ॲग्री’वर क्लिक करा. गणेश मंडप परवानगी चा अर्ज ओपन होईल. यात आवश्यक ती सर्व माहिती भरा.

गणेश मंडळाच्या मंडप स्थळाचा सविस्तर माहिती दर्शविणारा नकाशा अपलोड करा. यानंतर हमीपत्र, पोलिस परवानगी करिता खासगी जागेबाबत प्रमाणपत्र, वस्तीतील नागरिकांचे ना हरकत प्रमाणपत्र, गणेश मंडळाचे अध्यक्ष, सदस्यांचे हमीपत्र, मंडळातर्फे संरक्षणाकरिता नेमलेल्या स्वयंसेवक, सुरक्षा रक्षकांची यादी व संमतीपत्र, मंडळ पदाधिका-यांच्या नावाची यादी हे सर्व डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढा, त्यात आवश्यक सर्व माहिती भरून स्वाक्षरी करा. यानंतर भरलेले हमीपत्र व इतर सर्व कागदपत्रे स्कॅन करून ते संकेतस्थळावर अपलोड करा. आवश्यक शुल्क भरा व व्हिव अँड प्रिंट वर क्लिक करून प्रिंट काढा आणि सबमिटवर क्लिक करा. यानंतर आपल्याला नोंदणी क्रमांक प्राप्त होईल. आपल्या अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी डॅशबोर्डवर अर्जाची स्थिती तपासा यावर क्लिक करा. नोंदणी क्रमांक प्रविष्ट करून अर्जाची सद्यस्थिती पहा.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

संवेदनशीलतेने दिव्यांगांना सर्व योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी कार्य करा : मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी

Sat Sep 9 , 2023
– दिव्यांगांच्या विविध योजनांचा घेतला आढावा नागपूर :- दिव्यांगांप्रति संवेदनशील व्हा आणि त्यांना मनपाच्या सर्व योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या दृष्टीने कार्य करा, असे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी अधिका-यांना दिले.https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-14.56.12_caaf8c51.mp4 नागपूर महानगरपालिकेद्वारे शहरातील दिव्यांगांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा शुक्रवारी (ता.८) मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी आढावा घेतला. मनपा मुख्यालयातील आयुक्त सभाकक्षात झालेल्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com