मनपा आयुक्तांनी केली अंबाझरी तलाव येथील कामाची पाहणी

नागपूर :- अंबाझरी तलावावर सिंचन विभागाद्वारे सुरु असलेल्या कामाची मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी मंगळवारी (ता.७) पाहणी केली.

या पाहणी दौऱ्यात सिंचन विभागाचे मुख्य अभियंता पवार, मनपाचे मुख्य अभियंता राजीव गायकवाड, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, डॉ. श्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता नरेश बोरकर, उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, कार्यकारी अभियंता विजय गुरूबक्षाणी, सिंचन विभागाच्या अधीक्षक अभियंता सोनाली चोपडे, कार्यकारी अभियंता प्रांजली ठोंबसे आदी उपस्थित होते.

पावसाळ्यात कुठलिही आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये तसेच अंबाझरी तलावातील ओव्हरफ्लो वरील पाण्याचा लवकर निचरा व्हावा याकरिता सिंचन विभागाद्वारे कार्य सुरु करण्यात आले आहे. याशिवाय तलावाच्या मातीच्या बंधाऱ्याचे बळकटीकरण सुरु असून या सर्व कामांची मनपा आयुक्तांनी आज पाहणी केली. मान्सूनपूर्वी सर्व आवश्यक कामे पूर्ण होतील याकडे कटाक्षाने लक्ष देण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी यावेळी दिले.

नाग नदीच्या पात्रावर अंबाझरी ते क्रेझी केसल मार्गावरील पुलाचे सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे काम केले जाणार आहे. या पुलाच्या कार्याचा देखील यावेळी डॉ. चौधरी यांनी आढावा घेतला. मा. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आवश्यक सर्व काळजी घेऊन तलावाचे बळकटीकरण, मजबुतीकरण आणि ओव्हरफ्लो वरील पाण्याचा सुरळीत विसर्ग होण्याबाबत कार्य करण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

श्रुती फिल्म प्रस्तुत "तूच माझी साक्षी" हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार

Wed May 8 , 2024
नागपूर :- शेतकऱ्यांच्या समस्या व साक्षीच्या प्रेमाची कबुली देणारा हृदयस्पर्शी मराठी चित्रपट येतो आहे प्रेक्षकांच्या भेटीला. या चित्रपटाला तसं सांगायचं म्हटलं तर पडद्यावर येण्याकरिता 2017 पासून लेखक/ निर्माता/ दिग्दर्शक विलास गाडगे यांना संघर्ष करावा लागत आहे. व्यवहाराची देवाण घेवाण त्यातूनच आर्थिक टंचाईचा सामना करता करता आज या चित्रपटाला शूटिंग पूर्ण होऊन 7 वर्ष झाली आहे. थेंब-थेंब तळे साचून व आर्थिक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com