नागपूर : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवारी (ता.11) 6 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 35 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात गांधीबाग झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 2 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 10,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 3 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. तसेच नायलॉन मांजाच्या विरोधात 100 आस्थापनेची तपासणी करण्यात आली. ओम साई पतंग स्टोर्स या पतंग दुकानातुन 100 प्लास्टिक पतंगे जप्त करण्यात आली.उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल गांधीबाग झोन अंतर्गत टिमकी, मोमीनपुरा येथील महाकाली सोनपापडी आणि मुमताज ट्रेडर्स यांच्याविरुध्द कारवाई करून प्रत्येकी 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
त्याचप्रमाणे लक्ष्मीनगर झोन अंतर्गत अमरावती रोड येथील Dr. Pashine यांच्याविरुध्द रस्त्यालगत बांधकाम साहित्य कचरा पसरविल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. धरमपेठ झोन अंतर्गत अभ्यंकर नगर येथील श्री सदगुरु डेव्हलपर्स यांच्याविरुध्द रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
हनुमाननगर झोन अंतर्गत प्रभाग न.29, भारत माता नगर, हुडकेश्वर येथील प्रवीण मुरकुडे यांच्याविरुध्द रस्त्यालगत बांधकाम साहित्य कचरा पसरविल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. नेहरुनगर झोन अंतर्गत राम कृष्णा नगर, दिघोरी येथील नागपूर लंच बॉक्स यांच्याविरुध्द घरचा सामान्य कचरा रस्त्यालगत पसरविल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.