मल्टीमिडिया छायाचित्र प्रदर्शनाचे 25 ते 27 सप्टेंबर दरम्यान आयोजन

भंडारा :- जिल्हा प्रशासन व तसेच सूचना व प्रसारण क्षेत्रीय कार्यालय,नागपूर यांच्यावतीने 25 ते 27 सप्टेंबर दरम्यान तीन दिवसीय मल्टीमिडिया छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन बस स्टॅण्ड परिसरात करण्यात येणार आहे.

या आयेाजनाची पूर्वतयारी बैठक आज अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ,कमलाकर रणदिवे ,यांच्या दालनामध्ये आयोजित करण्यात आली होती.

यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी, मनिषा कुरसुंगे, तसेच शिक्षणाधिकारी माध्यमिक ,संजय डोर्लीकर, व नेहरु युवा केंद्राचे हितेंद्र वैद्य, तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

25 ते 27 सप्टेंबर 2023 रोजी महिला बचत गट,कृषी विभाग,तसेच जिल्हा परिषद विभागाचे शिक्षण विभाग,स्वच्छता पाणी पुरवठा विभाग,जिल्हा परिषद, या व इतर विभागाचे स्टॉल भंडारा शहराच्या बसस्थानक येथे लावण्यात येणार आहे.

आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष, मिशन इंद्रधनुष ,स्वच्छता मिशन यासह राज्य व केंद्र शासनाच्या विविध विकासकामाचे विषयावर हे प्रदर्शन असणार आहे. तरी नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट दयावी असे आवाहन अतिरीक्त मुख्यकार्यकारी अधिकारी, कमलाकर रणदिवे यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

चीखलाबोडी येथे करडई पीकाचा यशस्वी प्रयोग

Thu Sep 14 , 2023
– करडई पीक उत्पादन घेण्यासाठी कृषी विभागाचे प्रोत्साहन भंडारा :- धानाचे कोठार म्हणून ओळखल्या जाणा-या या जिल्हयात आता तेलासाठी ओळखल्या जाणा-या करडईचे उत्पादन ही चांगले होऊ शकते.सातत्याने धानाचे उत्पादन घेतल्याने पिक वैविध्य होत नाही ,परिणामी जमीनीचा पोतही सुधारत नाही.कृषी विभागाने करडई पीक उत्पादन घेण्यासाठी शेतक-यांना प्रोत्साहीत केले आहे.व याचे पीक प्रात्यक्षिक लाखनी तालुक्यातील चिखलाबोडी गावात करण्यात आला आहे. चिखलाबोडी हे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com