संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान :- विदर्भ शाहीर कलाकार परिषद व मानव शांती सांस्कृतिक प्रतिष्ठान यांच्या सयुक्त विद्यमाने कुलदिप मंगल कार्यालय कन्हान येथे बहुरूपिय कला महोत्सव व सत्कार सोहळा थाटात संपन्न झाला.
रविवार (दि.२९) सप्टेंबर ला विदर्भ शाहीर कलाकार परिषद व मानव शांती सांस्कृतिक प्रतिष्ठान, कन्हान व्दारे बहुरूपिय कला महोत्सव व सत्कार सोहळ्याचे आयोजन केंद्रीय अध्यक्ष मनिष भिवगडे यांच्या वतीने कुलदीप मंगल कार्यालय जे एन रोड कन्हान येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरूवा त भजन, दंडार, भारूड आदी मंडळाची कन्हान च्या मुख्य मार्गाने दिंडी काढुन करण्यात आली.
लोकांमध्ये लोक कलेच्या प्रचार व प्रसार या दिंडी च्या माध्यमातुन करण्यात आला. लोककलावंताची दिंडीयात्रा ही लोकां चे प्रमुख आकर्षण ठरले होते. महोत्सवात राजेंद्र मुळक माजी मंत्री तथा अध्यक्ष नागपुर जि.ग्रा. काँग्रेस कमेटी, नरेश बर्वे उपाध्यक्ष नागपुर जि.ग्रा.काँ.क, मा. शंकर चहांदे माजी समाज कल्याण सभापती जि. प. नागपुर व माजी नगराध्यक्ष आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत विदर्भ शाहीर कलाकार परिषद व मानव शांती सांस्कृतिक प्रतिष्ठान कन्हानच्या पदाधि का-यांनी नवनिर्वाचित खासदार श्यामकुमार बर्वे यांचा जंगी सत्कार करण्यात आला.
या बहुरूपिय कला महोत्सव व सत्कार सोहळ्यात भजन, कीर्तन, दंडार, भारुड, खडी गंमत, भीम गीते, आदिवासी नृत्य सादरीकरण करून लोककलावंताच्या ३७० मंडळानी सहभाग घेतला होता. संपुर्ण विदर्भ शाहीर कलाकार परिषद पदाधिकाऱ्यांनी खासदार बर्वे आणि माजी मंत्री राजेंद्र मुळक हयाना कलावंताच्या समस्येचे निवेदन दिले. याप्रसंगी अलंकार टेर्भुणे, दयाल कांबळे, रामनाथ पर्धिकर, चुडामन लांजेवार, शंकर रामटेके, अरुण साहारे, अरुण वाहने, पुरूषोत्तम निगोट सह मोठया संख्येने लोककलावंत सहभागी झाले होते.