राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शहरा व्दारे नवनिर्वाचित खासदार बर्वे यांचा नागरी सत्कार

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कन्हान :- राष्ट्रवादी कॉग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष कन्हान शहरा व्दारे रामटेक लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार श्यामकुमार बर्वे यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला.

शनिवार (दि.२८) ला सायंकाळी ७.३० वाजता धरमनगर च्या राजराजेश्वरी दुर्गा मंदिर प्रांगणात प्रमुख अतिथी राजेंद्र मुळक माजी मंत्री तथा अध्यक्ष ना. जि.ग्रा.काँ.क, सलिल देशमुख युवा नेते रा. कॉ.प.श.प, किशोर बेलसरे कार्याध्यक्ष नागपुर जिल्हा ग्रामीण, प्रकाश जाधव माजी खासदार रामटेक, नरेश बर्वे उपाध्यक्ष- नागपुर जि.ग्रा.कॉ .क. आदी मान्यवरांच्या हस्ते नवनिरवाचित खासदार श्यामकुमार बर्वे यांचा कन्हान शहर राष्ट्रवादी कांग्रेस पक्षा तर्फे भव्य नागरी सत्कार करण्यात आला.

सत्काराच्या उत्तरार्थ खासदार बर्वे हयानी सर्व मतदारांचे आभार व्यकत करून कन्हान नगरपरिषद अंतर्गत धरमनगर, पिपरी, सत्रापुर, आनंद नगर क्षेत्रातील रहि वासियांना शासकीय मालकी हक्काचे पट्टे मिळवुन देण्याच्या अनुषंगाने लवकरच पट्टे विषयी उपविभागिय अधिकारी रामटेक यांच्या सोबत बैठक लावुन विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

याप्रसंगी पुरणदास तांडेकर तालुकाध्यक्ष राकापा, ज्ञानेश्वर वीघे ज्येष्ठ नेता राकांपा, देवीदास तडस अध्यक्ष युवक राष्ट्रवादी राकांपा विधानसभा, अभिषेक बेलसरे अध्यक्ष कन्हान शहर, सतिश बेलसरे युवा नेता, शंकरराव पडोळे, दूध राम सव्वालाखे जि.प सदस्य, योगेंद्र रंगारी न.प. उपाध्यक्ष, योगिता भलावी, दिपा तिवारी, नगरसेविका रेखा टोहने, राखी परते, नगरसेवक विनय यादव, मनिश भिवगडे, कैलाश खंडार, सुत्तम मस्के सह अखिलेष मेश्राम, ज्ञानेश्वर दारोडे, लोकेश डहाके, सोहेल खान, प्रशांत मसार, महेश काकडे, विष्णु Watch, सुशिल कळमकर आदी समस्त पदाधिकारी, महिला आघाडी, युवा आघाडी आणि मोठ्या संख्येने नगरवासी उपस्थि त होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक पाटील कार्या ध्यक्ष रामटेक विधानसभा हयानी केले. सुत्रसंचालन डॉ. कमलेश शर्मा कार्याध्यक्ष कन्हान शहर यानी तर आभार सोशल मीडिया तहसिल अध्यक्ष शफीक शेख यांनी मानले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वेकोलि में राजभाषा पखवाड़ा का समापन

Tue Oct 1 , 2024
नागपूर :-14 सितम्बर 2024 से प्रारंभ राजभाषा हिंदी पखवाड़ा का आज 30 सितम्बर, 2024 को समापन हुआ। पुरस्कार वितरण एवं समापन समारोह में मुख्य अतिथि, निदेशक तकनीकी (संचालन/योजना एवं परियोजना) अनिल कुमार सिंह ने हिंदी में सर्वाधिक कार्य करने के लिए “क” क्षेत्र में पेंच और “ख” क्षेत्र में नागपुर को राजभाषा शील्ड प्रदान की। समापन समारोह में पखवाड़े के […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com