महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड
(नागपूर मेट्रो रेल प्रकल्प)
• जी – २० परिषदेनिमित्त महा मेट्रोच्या वतीने कार्य सुरु
नागपूर : “मोगली – द जंगल बुक” या कार्टून कॅरेव्कटरला लहानपनापासूनच सिनेमा,पुस्तके यांच्या माध्यमातून अनुभवाला व बघितली देखील आहे आता तोच मोगली पुन्हा एकदा आपल्या सर्वांच लक्ष्य जी – २० परिषदेनिमित्त ध्यानकर्षण करण्याकरता येत आहे. महा मेट्रोच्या वतीने जय प्रकाश नगर मेट्रो स्टेशन येथे मेट्रोला पिलरच्या दरम्यान “मोगली – द जंगल बुक” साकारल्या जाणार आहे ज्याचे निर्माण कार्य सुरु असून लवकरच याठिकाणी बसविल्या जाईल.
मोगली – द जंगल बुक या प्रतिकृती मध्ये मोगली स्वतः हातात मशाल घेऊन जंगलातील त्याचे प्राणी मित्र बघिरा (ब्लॅकपॅन्थर, बालू (भालू), का(साप), अकेला (लांडगा),किंग लुई(चिंपांजी) ,रक्षा (लांडगा),कोलोनोल हाथी(हत्ती),फादर वोल्फ, बंदर लोग(माकड) इत्यादी अशे अनेक पात्र या ठिकाणी शेर खान (वाघ) या खलनायकाशी सामना करण्याकरता सज्ज आहे.
रूडयार्ड किपलिंग यांनी मोगली – द जंगल बुक लिहिलेल्या पुस्तकावरून आज वर अनेक सिनेमा प्रकाशित करण्यात आले आहेत व याला मोठ्या प्रसिद्धी देखील मिळाली आहे.