मौदा :- बसस्टॉप चौक मौदा येथे दि. ०३/०७/२४ चे ०९/०० वा. ते ०९/१५ वा. दरम्यान यातील फिर्यादी नामे मंजुषा उर्फ माया मनसाराम भोयर, वय ४९ वर्ष, व्यवसाय गृहिणी, रा. शिवनगर मौदा, ता. मौदा जि. नागपूर हिचे पती व आरोपी नामे दामोधर बाळकृष्ण बुराडे रा प्लॉट नं. १२३४ रामनगर ता मौदा जि. नागपूर हे जवाई व साळा असुन यातील आरोपी हा मृतक नामे मनसाराम दलपतराव भोयर, वय ५४ याचे पत्नीस तुझा लग्नाला लावलेला खर्च परत दे या कारणावरून घटनेपुर्वी वाद करीत होता, तसेच पंधरा दिवसा अगोदर फिर्यादीचे घरी जावुन सुदधा लग्नाला लावलेले व्याजसहीत पंधरा लाख रूपये परत दे नाहीतर तुझ्या नवऱ्याला व मुलाला जिवाने मारून टाकील अशी धमकी दिलेली होती. घटनावेळी फिर्यादीचे पती मृतक नामे मनसाराम दलपतराव भोयर, वय ५४ वर्ष हे सकाळी ९.०० वा दरम्यान बसस्टॉप येथे पानठेल्या जवळ हजर असताना आरोपी नामे दामोधर बाळकृष्ण बुराडे हा तेथे आला व मृतक याला म्हणाला कि तुमच्या लग्नाला पैसे लावलेले आहे ते आता व्याजसहीत पंधरा लाख रूपये झालेले आहे तु ते पैसे परत कर असे म्हणुन पैश्याचे कारणावरून वादविवाद करून मृतकला आरोपीने थापडा तसेच हातबुक्यानी पोटावर मारून त्यांचा खुन केला.
सदर प्रकरणी फिर्यादी यांचे रीपोर्ट वरून आरोपीविरूद्ध पोस्टे मौदा येथे कलम १०३(१) भारतीय न्याय संहीता २०२४ अन्वये गुन्हा दाखल असून आरोपीस मौदा पोलीसांनी अटक केली आहे.
सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोहार (भापोसे), अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोरटे मौदा येथील ठाणेदार पोनि सतिशसिंग राजपूत, पोउपनि महेश बोथले, पोहवा संदीप कडु, रूपेश महादुले, गणेश मुदमाळी, पो.अं. अतिश गाढवे यांनी पार पाडली. गुन्हयाचा पुढील तपास सपोनि मनोज चौधरी हे करीत आहे.