नागपूर :- दिनांक-14/4/2023 रोजी सांयकाळी 6 वाजता. मध्य नागपुरातील बांगलादेश, तांडापेठ या परिसरात असलेल्या नाईक तलाव व लेंडी तलाव सौन्दर्यीकरनाच्या उदघाटन सोहळ्याला नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस हे प्रामुख्याने येणार आहेत. मागील 1 एप्रिल ची घटना लक्षात घेता, हलबा समाजाचा सामाजिक कार्यकर्ता, काँग्रेस चे युवा नेता मोतीराम मोहाडीकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतला.परमपूज्य डॉ. बाबासाहेब आम्बेडकरचा संविधान प्रमाणे हलबा जमातीला शेड्यूल ट्राईप (ST) मधे अधिकार प्राप्त आहे.पन BJP, RSS चा षडयंत्रमुळे आरक्षण खत्म करण्याचा कट रचुन हलबा सामाजाला 2014 चा लोकसभा निवडणूक असतांना हलबा बहुल एरिया मधे भर सभेत नितिन गडकरी व देवेंद्र फडणवीस यांनी सामाजाला जातिप्रमानपत्र व वैलिडिटी तीन महिन्यात करुण देतो.असा आश्वासन दिला होता. दिलेला आश्वासन न पाड़ता त्यांना त्यांची आठवण करुण देण्यासाठी मागील 1/4/2023 ला गोलीबार चौक या ठिकाणी भूमिपूजन कार्यक्रमात गडकरी व फडणवीस यांचा निषेध करण्यासाठी काळा झेंडा दाखविनार होता. पण पोलिसांना भनक लागताच मोतीराम मोहाडीकर यांना दुपारी 1.00 वा. DCP च्या आदेशाने गाँधीबाग पोलीस स्टेशनला 12 तास कोडुंन ठेऊन डिटेन केला. या सर्व गोष्टिची पुनरावृत्ति म्हणून 14/4/2023 ला मध्य नागपुर नाइक तलाव बंग्लादेश याठिकानी सांय.6.00 वा.सौंदर्यीकरण भूमिपूजन कार्यक्रमात नितिन गडकरी व देवेंद्र फडणवीस येत असून मोतीराम मोहाडीकर काळा झेंडा दाखविनार या भीतिने पोलिसांनी सांय.5.30 ला घरुन पुनः गाँधीबाग पोलीस तहशील ला नेण्यात आला व 4 तास बसून ठेवले.
मोहाडीकर ने BJP, RSS वर आरोप केला की हलबा सामाजाला दिलेला आश्वासन ची आठवण करुण देण्यासाठी निषेध आंदोलन करने गुनाह आहे का?ही तर सरासर लोकशाही ची हत्त्या असून हलबा सामाजाला त्यांचा अधिकार पासून वंचित ठेवण्याचा कट या सत्ताधारी पार्टी करत आहेत.हलबा समाजाची एवढी भीति वाटते तर हलबा समाजाचा प्रश्न येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या आधी नितिन गडकरी व देवेंद्र फडणवीस यांनी हलबा समाजाचा प्रश्न मार्गी लावावे.मोहाडीकर ने स्पष्ट इशारा केला की हलबा समाजाचा प्रश्न मार्गी लावनार नाही तर येणाऱ्या भविष्यात तीव्र आंदोलन,महाराष्ट्र सरकार चा निषेध म्हणून काळा झेंडा हलबा समाजाचा वतीने करण्यात येइल.